तालुक्यातील मोहरना येथील स्व. बिसनजी पाटील राऊत यांच्या ३५ व्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम सोमवारला ग्रामपंचायत कार्यालय मोहरणा येथील प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील दादाजी राऊत, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवी व लोककलावंत उतम बगमारे खरकाळा, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाऊराव राऊत, प्रा. तारक माटे, चाचेरे सर, कटरे सर, सरपंच प्रभाकर मेंढे, ऋषीजी राऊत, उपसरपंच परमेश्वर पिल्लेवान, सधाराम वाघधरे, मधुकर भोयर, ग्रा.पं.सदस्या दिक्षा बोरकर यांच्यासह आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांन प्रा.तारक माटे यांनी मुले कसे घडतील व यशस्वी होतील यावर प्रकाश टाकला, तर कवी उत्तम बगमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन मंगेश राऊत यांनी केले तर आभार बबलू राऊत यांनी मानले.
130921\1740-img-20210913-wa0051.jpg
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना मान्यवर