माझी मुलं माझी शाळा संमेलन : वंदना वंजारी यांचे प्रतिपादनवरठी : आकाशातील ध्रुवतारा आपली जागा बदलत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने यशाच्या सर्वोच्च शिखरावर आपली जागा निर्माण करावी. विद्यार्थ्यांनी यशासाठी कर्तृत्वाच्या मार्गाचा अवलंब करावा. शिक्षण हे यशाचे पहिले द्वार आहे. सर्वांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांनी केले.जिल्हा परिषद हायस्कुल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वरठी येथे माझी मुलं माझी शाळा अंतर्गत आयोजित शालेय स्नेहसंमेलन सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून राजू कारेमोरे व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, पंचायत समिती सदस्य रत्ना फेंडर, ग्रामपंचायत सदस्य नंदा सिरसाम, शशीकला चोपकर, प्राचार्य तथागत मेश्राम व देवदास डोंगरे उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषद हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक ताराचंद बोरकर, ग्रामीण कवी विष्णूपंत चोपकर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव देवदास डोंगरे, माजी सरपंच गंगाधर पंचभाई, शाळा समिती सदस्य मनीषा मडामे, मनोज शेंडे, देवकन्या बन्सोड, युवराज कुथे, घनश्याम गोस्वामी, ज्येष्ठ शिक्षक हेमराज दहिवले यांचा प्राचार्य सुहासिनी घरडे, स्नेहसंमेलन संयोजिका वर्षा दाढी, हिंमत तायडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात राजू कारेमोरे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहावे, असे सांगितले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. पण पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहारीक ज्ञान जोपासणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांना व्यवसायीक शिक्षणाकडे वळण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी आयुष्यात अनुभवलेले प्रसंग व यशस्वी उद्योजक बनण्यासाठी असलेल्या आवश्यक गोष्टी सांगितले. संचालन बाळासाहेब मुंडे, सुुनिता गायधने, प्रास्ताविक प्राचार्य सुहासिनी घरडे, आभार वर्षा दाढी यांनी मानले.कार्यक्रमास सहाय्यक शिक्षिका लीना पटले, दीपिका बांते, शशिकांत देशपांडे, अर्चना बागडे, सिद्धार्थ नंदागवळी, ज्ञानेश्वर मडावी, श्रीराम काळे, कविता भांडारकर, शाळा नायक विपुल रामटेके, हर्षल बन्सोड, नेहा बोरकर, प्राजक्ता तितीरमारे उपस्थित होते. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांनो, ध्रुव ताऱ्याप्रमाणे जगा
By admin | Published: February 01, 2015 10:51 PM