शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

परीक्षा दालनात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणार नोंद

By admin | Published: March 10, 2017 1:39 AM

परीक्षा दालनात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवण्याचे आदेश नुकतेच धडकले असून उशिरा येणाऱ्या

शिक्षण मंडळाचा निर्णय : तुमसरात उशिरा येण्याचे सत्र सुरूच तुमसर : परीक्षा दालनात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवण्याचे आदेश नुकतेच धडकले असून उशिरा येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद प्रपत्र ब मध्ये ठेवून त्यांचे संकलन परिरक्षक केंद्रामार्फत विभागीय मंडळाकडे दररोज सादर करण्याचे आदेश निर्गमीत झाले आहे. व्हायरल होणाऱ्या प्रश्नपत्रिकेवर आळा घालण्याकरिता शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला.इयत्ता १० व १२ च्या वार्घिक पीरक्षा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू आहेत. शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा व्हावी तथा व्हायरल प्रश्नपत्रिका होऊ नये याकरिता कदम नियम व पावले उचलली. यावर मात करीत प्रश्नपत्रिका व्हायरल होत आहेत. अनेक परीक्षा केंद्रावर परिक्षार्थी दररोज उशिरा येतात. उशिरा येण्याचे नेमके कारण केंद्र संचालन व परीक्षा उपसंचालकाला माहित आहे. नियमानुसार परीक्षा सुरू झाल्यानंतर ३० मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जातो. या संधीचा फायदा अनेक विद्यार्थी सध्या घेत आहेत.याची गंभीर दखल राज्य शिक्षण मंडळाने घेतली. सकाळी १०.४५ ते ११ दरम्यान प्रश्नपत्रिका मुख्यत: हॉयरल होत आहेत. त्यामुळे यापुढील सर्व परीक्षा कालावधीत सकाळ सत्रात १०.४५ नंतर व दुपार सत्रात २.४५ नंतर परीक्षा दालनात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद प्रपत्र ब मध्ये ठेवून त्यांचे संकलन परीक्षक केंद्रामार्फत विभागीय मंडळात करण्यात यावे तथा विभागीय मंडळांची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास दररोज करण्याचे निर्देश दिले आहेत.तुमसर शहर व तालुक्यात बहुसंख्य विद्यार्थी उशिरा परीक्षा केंद्रावर येत असल्याची माहिती आहे, परंतु त्यांची स्वतंत्र नोंद घेतली जात नाही. परिक्षार्थ्यांनी सकाळपाळीत १०.३० वाजता परीक्षा दालनात प्रवेश करणे अपेक्षित आहे. १०.५० ला प्रश्नपत्रिका व विहित करणे आवश्यक आहे. दररोज सकाळपाळीत ११ वाजेनंतर अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर धावत येतात. नेमके दररोज उशिरा येण्याचे कारण काय आहे हे सर्वांना माहिती आहे. दुपारपाळीतही हेच सुरू आहे. विभागीय परीक्षा मंडळाने परीक्षा दालनात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद काटेकोरपणे ठेवली तर उशिरा येणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही. परंतु असे होतानी दिसत नाही. दररोज ११ नंतर परीक्षा दालनात येण्याची परंपरा तुमसरात मागील तीन वर्षापासून सुरू आहे हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)