बॉक्l .विद्यार्थ्यांच्या अपघाताला कंपनीचे अधिकारीच जबाबदार
खरबी येथे अनेक तरूण पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादवरून आपल्या मूळ गावी परतले आहेत. आपले नोकरीचे कामकाज तसेच विद्यार्थी उच्चशिक्षित विद्यार्थी आपले अभ्यासक्रम परीक्षेचे कामकाज ऑनलाईन करत असताना वारंवार नेटवर्क डिस्कनेक्ट होत असल्याने त्रासले आहेत. त्यामुळे आपले काम होण्यासाठी रात्री दिवसा राष्ट्रीय महामार्गावर घराच्या छतावर अनेक जण चढतात. त्यामुळे यातून कोणाचा नाहक जीव गेल्यास या अपघाताला संबंधित कंपनीचे अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.
काेट
मोबाईल नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली आहेत. यासाठी तहसीलदारांना ही भेटलो. मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. समस्या न सुटल्यास ग्रामस्थांसह महामार्गावर रास्ता रोको करावा लागेल.
संजय आकरे, उपसरपंच, खरबी नाका
कोट
माझे पदवीचे शिक्षण सुरू आहे. कोरोनानंतर मी अनेक दिवस गावातच राहत आहे. अभ्यासक्रम ऑनलाईन करत असताना वारंवार अडथळे येतात. प्रसंगी आम्हाला राष्ट्रीय महामार्ग, घराच्या छताचा अनेकदा आधार घ्यावा लागतो.
वैशाली बोरकर,
पदवीची विद्यार्थिनी, खरबी नाका,