लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या आवासून उभ्या असतांनाही प्रशासनातर्फे समस्या सोडविण्यात येत नाही. त्यामुळे बहूजन रिपब्लिकन विद्यार्थीमोर्चा जिल्हा शाखेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट ऑफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकजुटीच्या माध्यमातून एकत्रीत येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.हल्लाबोल महामोर्च्यात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह बेरोजगारांनी सहभाग घेतला. मागण्यांमध्ये जिल्ह्यामध्ये ओबीसी वसतीगृह स्थापन करण्यात यावे, पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या जागेत वाढ करावी अन्यथा पोलीस भरती रद्द करण्यात यावी. इतर शासकीय वसतीगृहात ओबीसी प्रवर्गाच्या जागा वाढविण्यात याव्या, त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळावा, शिष्यवृत्तीत वाढ करावी, देशात होणारे खासगीकरण थांबविण्यात यावे, रोजगार निर्मितीसाठी विदर्भ राज्याची स्थापना करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.मोर्च्यात बेरोजगारांचीही उपस्थितीविद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या हल्लाबोल महामोर्च्यात विद्यार्थ्यांसह बेरोजगारांनी उपस्थिती लावली होती. या मोर्च्यात बीआरव्हीएमचे योगेश शेंडे, शुभम रामटेके, पंकज पडोळे, निशांत बडोले, शामिल गजघाटे, शशांक रंगारी, पलास चुटे, वासंती भुरे, अंजली भाजीपाले, पंकज पतरे, शुभम रहांगडाले, पुजा सारवे, निशा पारधी, भावना शहारे, प्रतिक गजभिये, सुशांत नागदेवे, पितांबर गौपाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.शासनाचे दुर्लक्षजिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी ९ आॅगस्ट रोजी जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही मागण्यांची पुर्तता करण्यात आली नाही. त्यानंतर पुन्हा २१ आॅगस्टला निवेदन देण्यात आले. त्यावेळी शासनाला अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही समस्या सुटली नसल्याने अखेर मोर्च्याचा मार्ग पत्करला.
विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 6:00 AM
येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देसंडे अँकर । प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा