शुभवर्तमान : शालेय पोषण आहार योजनेचा उपक्रम, सामाजिक बांधिलकी जोपासणारप्रशांत देसाई भंडाराशालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी व कुपोषण मुक्तीसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. या योजनेत वैविधता, नाविन्यता आणण्यासाठी व समाजाचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने विशेष दिनाचे औचित्य साधुन विद्याथ्यासाठी ‘स्नेहभोजन’ उपक्रमाचा निर्णय घेतला आहे. यातून सामाजिक बंधुता व सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल, हाच उद्देश शिक्षण विभागाने डोळ्यासमोर ठेवला आहे.शालेय पोषण आहार योजनेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात आलेले आहेत. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी योजनेमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. शालेय पोषण आहार योजनेत वैविधता, नाविन्यता आणण्यासाठी व समाजाचा सहभाग वाढविण्याच्या हेतुने विशेष दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत चांगला आहार देण्याचा उपक्रम लोकसहभागातून राबविणे आवश्यक आहे. लोकसहभागामुळे शिक्षण क्षेत्रात समाजाचा सहभाग वाढेल, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी पूरक पोषण मूूल्ये प्राप्त होतील. आहाराची पौष्टिकता वाढण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अन्न पदार्थाची चव चाखता येईल, तसेच सामाजिक बंधुता, एकतेची भावना, सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल. या अनुषंगाने शालेय पोषण आहार योनजेत लोकसहभाग वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने 'स्रेहभोजन' उपक्रमाचा सहभाग केला आहे.
लोकसहभागासाठी विद्यार्थ्यांचे ‘स्नेहभोजन’
By admin | Published: September 14, 2015 12:21 AM