बाळा काशीवार : खराशी येथील आनंद मेळावाभंडारा : सध्याचे युग स्पर्धेचे असून इंग्रजीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. विद्यार्थ्यांनाही इंग्रजी भाषेतूनच शिकविण्यात येत असल्याचे प्रमाण वाढले आहे. हे चांगले असले तरी प्रत्येकानी मातृभाषेचा गौरव करून विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे असे प्रतिपादन आमदार बाळा काशिवार यांनी केले.खराशी जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी दिलीप वाघाये, मुख्याध्यापक मुबारक सय्यद, वसंत शेळके, सरपंच पुरुषोत्तम फटे, लिलाधर चेटुले, रत्नाकर नागलवाडे, थालीराम बावणे उपस्थित होते.यावेळी काशिवार म्हणाले, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविधांगी योजना आणल्या आहेत. खराशी जिल्हा परिषद शाळा शाळासिद्धी उपक्रमात राज्यात अग्रस्थानी असल्याने जिल्ह्यासाठी भूषणावह असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.पहिल्या दिवशी पालकांच्या विविध सांस्कृतिक, बौद्धीक व शारीरिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. शाळेतील १४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला खराशीसह ग्रामस्थांनीही उपस्थिती दर्शविली. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्वच्छता व शौचालयाचा वापर यासाठी विद्यार्थी व पालकांची प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. आनंद मेळाव्यात विविध वस्तू विक्रीस आणून खरी कमाई करण्याचा व खाद्यपदार्थ विक्री करून पाच हजार रुपयांची कमाई विद्यार्थ्यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या बौद्धीक, क्रीडा स्पर्धांबरोबरच अंगणवाडी, प्ले स्कुलच्या विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. बक्षिस वितरण शिक्षक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विकास गायधने, राजेश सूर्यवंशी, राकेश चिचामे, भैय्या देशमुख, प्रकाश चाचेरे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना बक्षिस व पदके देऊन गौरविण्यात आले. मागील उपक्रमांची माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आली. यावेळी पालकांची संगीतखुर्ची, रस्सीखेच, कबड्डी, गीतगायन, नृत्य स्पर्धा घेण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी केले. संचालन सतीश चिंधालोरे यांनी तर आभार प्रदर्शन जयंत खंडाईत यांनी केले. कार्यक्रमाला राम चाचेरे, दुर्गा टेकाम, ललीता सेलोकर, सोनिका सूर्यवंशी, सुलभा मेश्राम, रेखा धोटे, सुजाता क्षीरसागर, दुधराम झलके, मालू आढोळे, यामिनी लांबकाने यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे!
By admin | Published: March 12, 2017 12:44 AM