लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्यासाठी तथागत गौतम बुध्द व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचण्यास पालकांनी आग्रह करावा, असे आवाहन सेवानिवृत्त प्राचार्य विजया पाटील यांनी केले.येथील वैशाली नगरातील सतधम्म बुद्ध विहारात आयोजित वर्षावास समारोप उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते एम.यू. मेश्राम होते. मंचावर सामाजिक कार्यकर्ते एम.डब्लू. दहिवले, वामनराव मेश्राम, तनूजा नेपाले, भद्राकात्यायनी, उपासिका संघाच्या अध्यक्षा शकुंतला हुमणे, सचिव कल्पना ढोके उपस्थित होते.सुरुवातीला भदंत सुगम स्थवीर यांनी परित्राण पाठ घेतले. त्यानंतर आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिने बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचे वाचन दहिवले यांनी केले. या उपक्रमाची शकुंतला मेश्राम, शांता नेपाले, जया शिंगाडे, लता ठवरे यांनी स्तुती केली. तनुजा नेपाले यांनी वर्षावासाचे महत्व समजावून सांगितले. वामनराव मेश्राम यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व सांगितले. दहिवले यांनी तथागत बुद्ध यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. परंतु ध्यान साधनापुरतेच गुरफटून न राहता दु:खीतांची सेवाही करण्यास सांगितले. आपणामध्ये प्रज्ञा व करुणाही असावी. तथागतांचा जन्म दु:खीतांची सेवा करण्याकरिता झाला. त्याचप्रमाणे इतरांनी वागावे असे तथागत गौतम बुद्ध यांनी म्हटल्याचा उल्लेख बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात असल्याचे सांगितले.एम.यू. मेश्राम म्हणाले, वैदिक धर्मानंतर तथागत गौतम बुद्ध यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित धम्माची स्थापना केली व तोच धम्म डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. प्रास्ताविक सचिव कल्पना ढोके यांनी केले. त्यांनी वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा वाचून दाखविला. संचालन व २२ प्रतिज्ञांचे वाचन जया शिंगाडे यांनी केले. आभार शांता नेपाले यांनी मानले.याप्रसंगी संघाच्या पदाधिकारी सुधा सुखदेवे, मीना वाहाने, शकुंतला गजभिये, रत्नमाला लांजेवार, विठाबाई बोरकर, रमाबाई मेश्राम, स्वर्णलता दहिवले, साधना लाडे, सीमा बडोले, विद्या मेश्राम, मनोरमा मोटघरे, शालीनी मेश्राम, नम्रता पाटील, सीमा घाबर्डे, छाया बंसोड, विणा घडले, शकुंतला मेश्राम, प्रभा चौरे, उषा धारगावे, सुलभा मेश्राम, पंचभाई, नगरारे, बिट्टू नारनवरे, पल्लवी बंसोड, प्रियंका शेंडे, वर्षा उके, मेघानंदा गवळी, वंदना मेश्राम, गोस्वामी यांनी सहकार्य केले.
बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेतून विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 6:00 AM
एम.यू. मेश्राम म्हणाले, वैदिक धर्मानंतर तथागत गौतम बुद्ध यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित धम्माची स्थापना केली व तोच धम्म डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. प्रास्ताविक सचिव कल्पना ढोके यांनी केले. त्यांनी वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा वाचून दाखविला. संचालन व २२ प्रतिज्ञांचे वाचन जया शिंगाडे यांनी केले.
ठळक मुद्देविजया पाटील : भंडारा येथे सत्धम्म बुद्ध विहारात वर्षावासाचा समारोप