शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

विद्यार्थ्यांनी उद्दिष्टांकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:33 AM

शहरीभागात शैक्षणिक, नोकरीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था उदयास आल्या.

ठळक मुद्देउपसेन बोरकर यांचे प्रतिपादन : पवनीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमतपवनी : शहरीभागात शैक्षणिक, नोकरीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था उदयास आल्या. परंतु गावपातळीवरील शिकणारा वर्ग यापासून दूर राहिला असला तरी विद्यार्थ्याने आपले शैक्षणिक उद्दिष्ट ठरवून त्या उद्दिष्टाकडे सतत चालत राहा, असे प्रतिपादन उपायुक्त उपसेन बोरकर यांनी केले.बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा तालुका पवनीच्या वतीने गांधीभवन येथे आयोजित विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरातून प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मार्गदर्शक पीएसआय, बावनकर यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी तसेच युपीएससी परीक्षेसंबंधी कोणता अभ्यास कसा व किती करावा यासंबंधी बोलताना स्पर्धा परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम याची पुरेपुर जाणीव करून त्यात वारंवार येणाºया प्रश्नांचा सराव करावा व त्यांची तयारी करावी.उपसेन बोरकर म्हणाले, शिक्षणाचे खासगीकरण तसेच उद्योग व्यवसायांचे खासगीकरण त्यामुळे आजपर्यंत मिळत असलेल्या शासकीय नोकºया मिळणे कठीण झाले. यश प्राप्त करताना अनेक अडचणी आल्या, मानहानी सोसावी लागली तरी पुढे चालत राहा, लोक काय म्हणतील याची तमा न बाळगू नका असेही बोरकर म्हणाले.तसेच कधीकधी येणारे प्रश्नही निट समजावून सांगावे. पदवी पर्यंत शिक्षण घेतलेला कोणताही विद्यार्थी प्रयत्न करून स्पर्धा परीक्षा देऊ शकतो. यात खूप टक्केवारी किंवा सर्व विषयांचा सखोल ज्ञानाची गरज नसून जवळपास चौथी ते १२ वी पर्यंतच्या विषयांचे सामान्य ज्ञान तसेच मुळ संकल्पना स्पष्ट करून, सामान्य ज्ञान तसेच दररोजच्या घडणाºया देश विदेश पातळीवरच्या घटना, वर्तमानपत्र, टीव्ही वरून नोंद केल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळू शकते. असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांत निर्माण केला.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी जागरूक नसल्याची खंत व्यक्त करून त्यांच्यात शैक्षणिक रोजगार तसेच वर्तन समस्या, वरिष्ठांच्या आज्ञान पाळणे या समस्यामुळे मोठा असून, स्पर्धा परीक्षेसाठी जागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.उपस्थित विजयकुमार, वैशाली, अशोक पारधी यांनीही विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेतल्याशिवाय नोकरी मिळणारच नाही या संबंधी आस्वस्थ केले.कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी व युवा यांची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक वास्तविक अवस्था यावर प्रमुख मार्गदर्शक प्रा.संजय मगर यांनी देशातील बहुजन समाजाला एकाकी पाडून, त्यांना शिक्षण, नोकऱ्या व्यवसाय यात कोंडमारा करून हलाकीची परिस्थिती निर्माण करण्याचे षडयंत्र सुरु असून बहुजन समाजाच्या नोकºया आरक्षण पळविल्या व लाचारी, गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न सुरु असल्यामुळे वेळीच बहुजन विद्यार्थ्यांनी क्रांतीसाठी उठून तयार असावे. विद्यार्थ्यांनो तुमचे भविष्याचे तुम्हीच शिल्पकार आहात.कार्यक्रमाचे आयोजन, व्यवस्थापन संदीप मोटघरे, शुभम राहांगडाले, बी.आर.व्ही.एम. चे जिल्हा व पवनी तालुका पदाधिकारी श्रीकांत देशमुख, अश्विन मेश्राम, हरिश उकरे, मोनू पचारे, ऐश्वर्या दहिवले, प्रणय शेंडे, पंकज पडोळे, वासंती भुरे, कार्तिक अन्नपुर्णे, संदीप शेरकुरे, शुभम माथूरकर, आशिष भुरे, अंजनी भाजीपाले, स्नेहल हुमणे, प्रज्ञा मेश्राम, चेतन जनबंधू, पूनम शेंडे, मोनू पचारे, अक्षय लकडस्वार, रोशन मेंढे, प्रगती रामटेके, पुष्पा कावळे, पंकज पत्रे, शुभम राहांगडाले, शशांक नागदेवे, प्रतिक गजभिये यांनी व्यवस्थापनात सहकार्य केले.