ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना साकडे : खासदारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असून पीक विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा पीक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा जिल्ह्यामध्ये मागील वर्षी धान उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकावर तुडतुडा रोग पडल्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. त्यामुळे शासनाने धानपिक नष्ट झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदत मंजूर केली आहे. परंतु भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित राहावे लागले. पीक विम्याची तसेच तुडतुडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम तातडीने देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, शहराध्यक्ष नितीन तुमाने, तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, नगरसेवक अमर उजवणे, अरविंद पडोळे, सुनिल शहारे, बाळा गभणे, लोकेश नगरे, ताहीर, केशव पंचभाई, हेमंत महाकाळकर, जॉन स्कॉट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.पीक विम्याची रक्कम न देणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 9:23 PM