लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मनात जिद्द व मेहनत करण्याच्या निश्चय केला की कुठलीही बाब अशक्य नाही. अशीच असाध्य गोष्ट साध्य करून दाखविली आहे, महर्षी विद्या मंदिर शाळा भंडाराची विद्यार्थीनी आरोही रामनाथ चव्हाण हिने. दुर्धर आजारावर मात करून तीने दहावीच्या (सीबीएसई) परिक्षेत ९७टक्के गुण घेवून जिल्ह्यातून दुसरा येणाचा मान प्राप्त केला.आरोही ही दोन वर्षांची असताना तिला किडनीचा ‘नेप्रोटीक सिंड्रोम’ नावाचा आजार झाला होता. बहुतांश लोकांमधून एकाला हा आजार आढळतो. अशात, आरोहीला जपणे चव्हाण दाम्पत्यासाठी आव्हान ठरले. आरोहीचे आई-वडील दोन्ही पेशाने शिक्षक. आजार पणात आरोही सांभाळ करणे मोठे जिकरीचे ठरले. मी या आजारातून लवकर बरी होणारच, असा आशावाद जोपासत आरोहीने याचा परिणाम शिक्षणावर कधी पडू दिला नाही. इयत्ता पहिलीपासून ते नववीपर्यंत वर्गात पहिल्या क्रमांकावर ती उर्तीर्ण व्हायची. दहावीतही तिने अभ्यासात सातत्यपणा ठेवला. आरोहीची मोठी बहीण ही अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे. चव्हाण कुटुंबिय गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील मूळ रहिवासी असून ते सध्या शहापूर येथे वास्तव्यास आहेत. आरोहीने यशस्वी जीवनाकडे वाटचाल सुरू केली असून तिने भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई ज्योेती, वडील रामनाथ चव्हाण, प्राचार्य श्रृती ओहळे व शिक्षकवृदांना देते.
जिद्दीच्या बळावर खेचून आणले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 10:36 PM
मनात जिद्द व मेहनत करण्याच्या निश्चय केला की कुठलीही बाब अशक्य नाही. अशीच असाध्य गोष्ट साध्य करून दाखविली आहे, महर्षी विद्या मंदिर शाळा भंडाराची विद्यार्थीनी आरोही रामनाथ चव्हाण हिने. दुर्धर आजारावर मात करून तीने दहावीच्या (सीबीएसई) परिक्षेत ९७टक्के गुण घेवून जिल्ह्यातून दुसरा येणाचा मान प्राप्त केला.
ठळक मुद्देलोकमत पे्ररणावाट : विद्यार्थ्यांसाठी आदर्श