लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. आतापर्यंत तीन हजार ७७६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले असून त्यापैकी तब्बल २२५८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शनिवारी जिल्ह्यात १७२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला.जिल्ह्यात कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा देण्यात आले आहेत. तसेच चार खाजगी क्षेत्रातही कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली. यासोबतच लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना गृहविलगीकरणाची सुविधाही देण्यात आली आहे. जिल्ह्यात उपचाराखाली असलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शनिवारी ११० व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत २२५८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात १३५८ व्यक्तींवर उपचार सुरू आहे. शनिवारी तुमसर तालुक्यातील एका ७६ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ८० व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसाठी प्रशासनाच्यावतीने विविध सोयी सवलती दिल्या जात असून त्यांना अग्रक्रमाने उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.शनिवारी जिल्ह्यात १७२ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील १०५ व्यक्तींचा समावेश आहे. साकोली तालुक्यात २७, तुमसर १६, मोहाडी आणि लाखनी तालुक्यात प्रत्येकी आठ, लाखांदूर सात आणि पवनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७३६ व्यक्ती कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी १९३५ व्यक्ती एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. शहरात रुग्णसंख्या वाढत आहे.ं
जिल्ह्यात २२५८ व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 5:00 AM
जिल्ह्यात कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा देण्यात आले आहेत. तसेच चार खाजगी क्षेत्रातही कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली. यासोबतच लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना गृहविलगीकरणाची सुविधाही देण्यात आली आहे. जिल्ह्यात उपचाराखाली असलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
ठळक मुद्देशनिवारी जिल्ह्यात आढळले १७२ बाधित । भंडारा तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद