आॅनलाईन लोकमतभंडारा : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली यात उघड्यावर ठेवलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दुसरीकडे कडधान्याला या पावसामुळे काही प्रमाणात फायदा झाला आहे. भंडारा शहरातही मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने याचा आठवडी बाजाराला फटका बसला.तुमसर तालुक्यात भाजीपाल्याचे नुकसानतुमसर : तुमसर शहरासह तालुक्यात सुमारे एक तास मेघगर्जनेसह वादळी पावसाने दुपारी १ वाजताच्या सुमारास हजेरी लावली. रबी पिकांना काही प्रमाणात फायदा झाला तरी ढगाळ वातावरणामुळे शेतातील उभ्या पिकांना नुकसानीची शक्यता अधिक आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी सुसाट वाºयासह वादळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे एकतास पाऊस बरसला. दूचाकी वाहनधारकांना यावेळी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. उभ्या शेतातील लाखोरी, हरभरा, गहू, जवस पिकांना थोड्या प्रमाणात फायदा झाला तरी येणाºया पुढील २४ तासात पाऊस बरसला तर मोठ्या नुकसानीची शक्यता आहे. भाजीपाला पिकांना येथे नुकसान झाले आहे. शेतातील टमाटर पिकाला धोका निर्माण झाला आहे. दोनपेक्षा जास्त दिवस ढगाळ वातावरण राहीले तर पीकांचे मोठे नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच शेतकरी हवालदील झाला असून अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकटाचे ढग दिसत आहेत. शेतीचे येथे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य के. के. पंचबुध्दे यांनी केली आहे.लोहारा परिसरात मेघगर्जनेसह पाऊसजांब (लोहारा) : आज दुपारी मेघगर्जनेसह वादळी पावसाने गव्हाचे पिक जमीनदोस्त झाले. त्याचप्रमाणे लोहारा जांब गायमुख परिसरातील टमाटर, कोबी, मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसामुळे गायमुख यात्रेच्या ठिकाणी दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. शेतकºयांच्या हाती येणारे रबी पिक या वादळी पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती आहे.दिघोरी परिसरात जनजीवन विस्कळीतदिघोरी/ मोठी : दिघोरी व परिसरात दुपारी वादळी वाºयासह मुसळधार पावसाने झोडपले असून जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. याशिवाय रबी व भाजीपाल पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, गहू, हरभरा, मूग, उडीद, लाखोळी व तुरीचे उभे पीक असून या सर्व पिकांचे पाण्यामुळे नुकसान झाले. बरीच पिके हे फुलोरा अवस्थेत असल्याने फुलांची गळती झाली. जमीनीत जास्त ओलाव्यामुळे सदर पिक कोमेजून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच भाजीपाला पिकांचीही अतीपावसाने मोठी हानी झाली असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.आसगाव परिसरात वादळी पावसाचा तडाखाआसगाव (चौ.) : चौरास भागात रब्बी पिकाचंी वाढ चांगल्या प्रमाणात झाली होती. रबी पिकाचे मोठया प्रमाणात हानी झाली आहे. रबी पिकांचे पिकही चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पदरात पडणार होते. पंरतु रविवारी दुपारी २ वाजता आलेल्या अवकाळी वादळ वाºयासह आलेल्या अर्धा तास पावसामुळे शेतातील उभे पीक जमीनीवर झोपली. पावसामुळे शेतातील तुर, चना, गहू, उळीद, मुंग, जवस, वटाणा, चना, मसूर, लाख-लाखोरी, पोपट, सांभार, शेतातील गुरांचा गावत वादळी पावसामुळे झोपी गेली. काही शेतकºयांच्या शेतातील रबी पिकांची कापणी सुरु होती तर काहीचे चुरण सुरु होते. ते संपूर्ण पावसात सापडून ओले झाले. घरावरचे कवेलू, टिनाचे पत्रे उडाले, शेतातील झाडांची मोड झाली. आंब्याच्या मोहर गळून पडला. या नुकसानीचा अंदाज बांधता येत नसला तरी रबी पिकांची नुकसान होणार आहे. गुरांचा चारा व शेतातील माल काळपट पडणार आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानीच्या कळा हळूवार सोसाव्या लागणार आहेत एवढ मात्र खरे.बागायती शेतीचे नुकसानपालांदूर : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत रविवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात बागायत शेतीचा जबर नुकसानीचा फटका बसू शकतो फुलकोबी लवकरच काढणीला येत मिरची पिकाला बुरशीजन्य रोगांची लागण शक्य आहे.अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. टमाटर पिकाला सुध्दा नुकसानच शक्य आहे. माकडांमुळे नुकसान ग्रस्त घरांचे या पावसाने ओलीचिंब केले. काळेकुट्ट ढगानी आकाशात एकच गर्दी करीत सुसाट वाऱ्याला रान मोकळे असल्याने शेतशिवारातील मजुरवर्ग धास्तावून गावाकडे घाई-घाइने धावला. पावसाचा जोर बघता मिळेल तिथ असारा घेतला. पावसाच्या विश्रांतीनंतर सुर्याने दर्शन दिले. पुढील आणखी तीन दिवस पाऊस व गारपीटीची शक्यता वर्तविली जात आहे. खरीपाला पाऊस न झाल्याने रबी पिके असून नसल्यासारखी स्थिती असल्याने नुकसान अत्यल्प आहे. वास्तविकता अवकाळी पावसाने केव्हाही नुकसानच अधिक असते,मोहाडीत रबी पिकांचे नुकसानमोहाडी : मोहाडी परिसरात वादळी वाºयासह पाऊस आला. वादळी पावसाने रबी पिकांचे नुकसान झाले. हरभरा, गहू, लाखोरी या पिकांना फटका बसला आहे. वाऱ्यामुळे गहू पिक जमिनीला लागले आहे. पंधरा ते वीस मिनीटे विजेचा कडकडाट, वारा व पाऊस झाला. थंड वारा वाहू लागला आहे. त्यामुळे थंडीमध्ये वाढ झाली आहे. काहीचे गहू कापायच्या स्थितीत आले. त्यामुळे काळपट गव्हाचे पीक हातात येणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.गोदामाबाहेरील धान्याची नासाडीलाखांदुर : रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे शेतमालासह, आधारभुत धान खरेदी केंद्र व क्रुषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. शासकीय धान खरेदी विक्री केंद्र हरदोली, तई/बु. या सह पंचशील राईस मिल मासळ येथे आधारभूत धान खरेदी केंद्रा अंतर्गत धान खरेदी करण्यात आला असून, गोडाऊन भरगच्च असल्याने हजारो क्विंटल धान उघड्यावरच ठेवण्यात आले होते. दुपारच्या सुमारास पडलेल्या अवकाली पावसामुळे उघड्यावरील धान पूर्णत: ओले झाले. जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना गोदामातील धान्याची उचल थांबवून उघड्यावरील धान्याची उचल करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी याकडे कानाडोळा केल्याचे सांगण्यात येत आहे.अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. शेतकऱ्यांच्यवा तोंडातील घास हरावल्याप्रमाणे रबी पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. गहू, वटाणा, तुरी, हरबरा पीक जमीनदोस्त झाले आहे. मार्च महिन्यापूर्वी बँक सोसायट्यांचे कर्ज भरावे लागते. त्यामुळे कजार्ची परतफेड कशी करावी या प्रश्नाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
अवकाळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:35 PM
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली यात उघड्यावर ठेवलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
ठळक मुद्देउघड्यावर ठेवलेल्या धानाची नासाडी : कडधान्याला काही प्रमाणात फायदा, कवेलू, टिनाचे पत्रे उडाले