लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानिक ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब लाखनीतर्फे लाखनी शहरात सुगरण पक्ष्यांची गणना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना यांच्या निर्देशाप्रमाणे घेण्यात या सुगरण पक्षी गणनेत लाखनी शहरात तीन ठिकाणी त्याचे अधिवास क्षेत्र आढळले. तीनही अधिवास क्षेत्रात एकूण ५२ सुगरण पक्ष्यांचे खोपे व ७२ नर-माती सुगरण पक्षी आढळले. सुगरण पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने भारतात काळ्या छातीची सुगरण, रेषाळ सुगरण व साधी सुगरण अशा प्रजाती आढळतात.तीनही अधिवास क्षेत्रात लाखनी शहरात बाया सुगरण ही प्रजाती आढळली असे ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबचे संघटक व निसर्ग अभ्यासक प्रा. अशोक गायधने यांनी सांगितले.या सुगरण पक्षी गणनेमध्ये ग्रीनफ्रेंडचे पदाधिकारी अशोक वैद्य, निसर्गमित्र पंकज भिवगडे, नितीन पटले, पंकज कावळे, अतुल डोंबरे, वज्रेश मेश्राम, भूषण धांडे, रोहित देशमुख, वेदांत धांडे, तिलक गभने, दिलीप भैसारे यांनी सहभाग नोंदविला होता. या सुगरण पक्षी गणनेमध्ये कमीत कमी २५ ते ३० खोपे अर्धवट व अपुर्ण अवस्थेत आढळली. त्यामागचे कारणे विषद करताना ग्रीनफ्रेंडसचे संघटक प्रा. अशोक गायधने यांनी सांगितले की, हे घरटे मादी सुगरण पक्षाने नाकारले आहे व ते नर सुगरण ने अपुर्ण ठेवून पुन्हा नवीन घरटे त्याने बांधले आहे. यावेळी त्यांनी सुसिद्ध वºहाडी कवीयित्री बहिणाबाईने रचलेले सुगरण पक्ष्याबद्दल काव्या ओळी ऐकविल्या. 'खोपा इवला इवला, जसा झुलता बंगला' तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला, आदी काव्यओळीची प्रचिती पक्षी निरीक्षकांना सुगरण पक्षी गणने दरम्यान सर्वांना आल. सर्वांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला.या सुगरण पक्षी गणनेचा अहवाल बीएनएचएस मुंबईचे ‘कॉमन बर्ड मॉनिटरींग प्रोग्रॉमचे प्रोजेक्ट’ अधिकारी नंदकिशोर दुधे तसेच महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांचेकडे पाठविण्यात आला. अशा प्रकारची सुगरण पक्षी गणना मागण्यापुर्वी घेण्यात आली. त्यावेळी ४० घरटी ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबला आढळली होती.
ग्रीनफ्रेंडस् क्लबतर्फे सुगरण पक्ष्यांची गणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 9:56 PM
स्थानिक ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब लाखनीतर्फे लाखनी शहरात सुगरण पक्ष्यांची गणना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना यांच्या निर्देशाप्रमाणे घेण्यात या सुगरण पक्षी गणनेत लाखनी शहरात तीन ठिकाणी त्याचे अधिवास क्षेत्र आढळले. तीनही अधिवास क्षेत्रात एकूण ५२ सुगरण पक्ष्यांचे खोपे व ७२ नर-माती सुगरण पक्षी आढळले.
ठळक मुद्दे५२ खोपे आढळले : ७२ सुगरण पक्षी, लाखनीत उपक्रम