भंडारा जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या ८० हजारांच्या वर आहे. त्यात सहा महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांची संख्या ३३ हजार २७६ आहे. तसेच जिल्ह्यात गरोदर मातांची संख्या ४ हजार ८६४, स्तनदा मातांची संख्या ५३४७ आहे. पूरक पोषण आहार अंतर्गत बालकांसाठी गहू, तांदूळ, चना, मसूर डाळ, साखर, तिखट, मीठ, हळद या आठ धान्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र यापूर्वी साखरेऐवजी तेलाचा पुरवठा करण्यात येत होता, मात्र काही महिन्यांपासून तेलाऐवजी साखरेचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे साखरेची फोडणी टाकायची की तेलाची असा प्रश्न आपसूकच गृहिणी विचारत आहेत. शासनाच्या निकषानुसार तेलाचे वाटप करायला हवे, असताना साखर दिली जात असल्याने चर्चेला पेव फुटले आहे.
पूरक पोषण आहार योजना
एकूण लाभार्थी - 81 हजार 536
6 महिने ते 3 वर्ष गटातील लाभार्थी - 33 हजार 276
गरोदर मातांची संख्या -4 हजार 864
स्तनदा माता -5347
बॉक्स
काय काय मिळते
कुपोषण मुक्तीचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना गहू, तांदूळ, चना, मसूर डाळ, साखर तिखट मीठ हळद धान्य दिले जाते. मे महिन्यात मुंग डाळ देण्यात आली. कोणत्या तालुक्यात गहू तर कुठल्या तालुक्यात तांदळाचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत अंगणवाडीत नोंद असलेल्या बालकांना सदर पूरक पोषण आहार दिले जाते. जिल्ह्यातील 1413 पेक्षा जास्त अंगणवाडीमधून सदर धान्य दिले जात आहे. मात्र तेलाऐवजी साखरेचे वाटप होत आहे.
साधा बॉक्स
लॉकडाऊन काळात मोठे आव्हान
अंगणवाडीमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून बालकांना पूरक पोषण आहाराचे वाटप केले जाते. मात्र गतवर्षीपासून लॉकडाऊन व सतत संचारबंदीची परिस्थिती असतानाही या अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी कधी घरपोच तर कधी अंगणवाड्यामधून व पूरक पोषण आहाराचे वाटप केले. कधीही खंड पडू दिला नाही. एक आव्हान म्हणून हे कार्य सातत्याने सुरू केले, मात्र या अंगणवाडी मदतनीस व सेविकांचा प्रश्न अजूनही सरकारदरबारी अधांतरी आहे.
कोट र्बॉक्स
फोडणी कशी द्यायची
पूरक पोषण आहार अंतर्गत यापूर्वी तेल मिळत होते. अन्य साहित्य मिळत आहे, मात्र तेलाऐवजी साखर मिळत असल्याने समस्या उद्भवत आहे. आता तेलाची फोडणी द्यायची कशी असा प्रश्न निर्माण होत आहे.
- माधुरी पुसाम, साकोली.
धान्याचा पुरवठा होत असला तरी तेल मिळणे आवश्यक आहे. तेलाऐवजी साखरेची फोडणी द्यायची का असा सवाल निर्माण होतो. शासनाने याबाबत विचार करण्याची गरज आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-हिराबाई लांजेवार,भंडारा
पूरक पोषण आहार नियमित मिळत आहे, मात्र तेलाचा पुरवठा का बंद केला, याबाबतचे कारण आम्हाला कळले नाही. साखर मिळत आहे त्याचे स्वागत आहे, परंतु तेलाचाही पुरवठा व्हावा, अशी आमची इच्छा आहे.
-अंजली रामटेके, भंडारा