मेस्टाचे अधिवेशन : संजयराव तायडे पाटील यांचे प्रतिपादन भंडारा : इंग्रजी माध्यम संस्था संचालकाना सरकार गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत आहे. शिक्षणाचे उदारीकरण करण्याच्या नावावर दररोज नवीन नवीन कायदे आणि जी आर काढत आहेत. शासन स्तरावर येणारे नवीन कायदे हे शिक्षणाच्या हित साधणारे नाहीत. उलट शिक्षणाचे काम करणाऱ्यांना शिकवण्यापासून परावृत्त करणारे आहेत. २५ टक्के अंतर्गत तीन वर्षापासून शाळेला पैसा देण्यात आला नाही. पुर्विच स्वत: जवळचे पैसे खर्च करून सर्व सुविधा युक्त शिक्षण पुरवणाऱ्या शाळांना फिस बुडवणाऱ्याचा हिस्सा मोठा आहे. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यम शाळा व संचालकाचे २५ टक्के अंतर्गत देण्यात येणारी फिस शासनाने बुडवली. इंग्रजी माध्यम शाळा आर्थिक संकटात आल्या आहेत. एक दिवस शेतकऱ्याप्रमाणे इंग्रजी माध्यम संस्था संचालक आत्महत्या करतील, अशी स्थिती शासन निर्माण करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी केली आहे.महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टी असोसिएशन भंडाराचे जिल्हा अधिवेशन भंडारा येथील साखरकर सभागृहात घेण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन संघटनेच्या राज्य महिला संघटनेच्या अध्यक्ष जागृती धर्माधिकारी यांच्या हस्ते, संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांच्या अध्यक्षतेत झाले. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य महासचिव राजेंद्र दायमा, राज्य उपाध्यक्ष डॉ. गजानन नारे, नागपूर विभाग प्रमुख गंगाणर नाकाडे, विदर्भ प्रमुख प्रमुख संजय कोचे, नागपूर, जिल्हा अध्यक्ष नाना सातपुते, आशिष पालीवाल, मेस्टा भंडाराचे महासचिव भास्कर उपाध्यक्ष मुरलीधर भर्रे, महिला आघाडी प्रमुख व जिल्हा उपाध्यक्ष नेहा खैरे, कोषाध्यक्ष राकेश गजभिये व जिल्हा अध्यक्ष सुनिल मेंढे उपस्थित होते.जिल्हास्तरीय अधिवेशनात अनेक ठराव एकमताने पारीत करण्यात आले. यात शैक्षणिक शुल्क ठरवण्याचा अधिकार शाळा संचालकांना त्यांच्या सुविधेनुसार देण्यात यावा, संस्था संचालक व कार्यरत कर्मचाऱ्याकरीता संरक्षण कायदा, आरटी एक्टमध्ये सुधारणा, २५ टक्के प्रवेशाचा तिढा सोडवून त्याचा मोबदला म्हणून देण्यात येणारे पैसे त्वरीत देण्यात यावे, फि बुडवणाऱ्या पालकानावर कारवाई, प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करावा असे एकूण १५ ठराव याप्रसंगी घेण्यात आले. सदर सर्व ठराव संघटनेच्या वतीने शासनाला सादर करण्यात येईल. यावर त्वरीत तोडगा न निघाल्यास मोठ आंदोलन उभारण्याचे ठरवण्यात आले. संचालन जिल्हा संघटनेचे संयोजक तथागत मेश्राम आणि आभार पालीवाल यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील १०० च्या वर संस्था संचालकानी हजेरी लावली होती. कार्यक्रमास जी.एन. टिचकुले, मनिष तिवारी, डॉ. नरेश पारधी, महेंद्र वैद्य, तुर्रम गोन्नाडे, मुकेश थानथराटे, थॉमस, पुष्पा पारधी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
तर संस्था संचालकांवर येणार आत्महत्येची पाळी
By admin | Published: September 12, 2015 12:40 AM