शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

दहा महिन्यात १६ शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 9:51 PM

काळया मातीसह निर्सगानेही साथ दिली नाही. अशात कर्जबाजारीपणा व चिंतेने ग्रासून मागील दहा महिन्यात जिल्ह्यातील १६ शेतकºयांनी आत्महत्या केली.

ठळक मुद्देसातबाराची अडचण कायम : मदतीची पाच प्रकरणे निकाली

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काळया मातीसह निर्सगानेही साथ दिली नाही. अशात कर्जबाजारीपणा व चिंतेने ग्रासून मागील दहा महिन्यात जिल्ह्यातील १६ शेतकºयांनी आत्महत्या केली. उल्लेखनीय म्हणजे यातील मृत पावलेल्या फक्त पाच शेतकºयांच्या कुटुंबाला एक लाखांची शासकीय मदत मिळाली आहे. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जीव गेल्यास चार लाखांची मदत मिळते, परंतु जगाच्या पोशिंदाच्या कुटुंबाला एक लाखांची तोकडी मदत दिली जाते.शेतकºयांच्या आत्महत्येच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जिल्ह्यात मागील १४ वर्षात एकूण ४८४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.यात सर्वात जास्त आत्महत्या सन २००८ मध्ये झाल्या. यात ६१ शेतकºयांनी विविध कारणांनी जगाचा निरोप घेतला. मात्र तिथेही शासन- प्रशासन मागे राहिले नाही. ६१ पैकी फक्त १२ शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली. मृत पावलेल्या शेतकºयाचे नाव सातबारावर नसणे, ही मुख्य बाब आर्थिक मदतीच्या आड आली आहे. त्यातही अन्य तांत्रिक अडचणींमुळे मृत पावलेल्या शेतकरी कुटुंबियातील नागरिाकांना अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही.१४ वर्षात ४८४ आत्महत्याजिल्ह्यात सन २००३ ते २०१७ या कालावधीत एकुण ४८४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात वर्षनिहाय अंतर्गत २००३ मध्ये ३, २००४ मध्ये ७, २००५ मध्ये १२, २००६ मध्ये ५१, २००७ मध्ये ५०, २००८ मध्ये ६१, २००९ मध्ये ३०, २०१० मध्ये ३१, २०११ मध्ये ४४, २०१२ मध्ये १८, २०१३ मध्ये १५, २०१४ मध्ये ३६, २०१५ मध्ये ५६ तर २०१६ मध्ये ५४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात एकुण ४६८ शेतकरी आत्महत्येपैकी फक्त १९६ शेतकरी कुटुंबांना शासनाकडून मदत मिळाली.या कुटुंबांना मिळाली मदतयावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत १६ शेतकºयांनी आत्महत्या केली. यात विलास शंकर मारवाडे रा. बेटाळा (मोहाडी), रविंद्र ब्राम्हणकर रा. विरली(पवनी), प्रेमदास गणपत घरत रा. तिर्री(पवनी), ईश्वर तुळशीराम मदनकर रा. खोलमारा(लाखांदूर), बापू डोमा बोरकुटे रा.चोवा (भंडारा) असे मृत पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात आली आहे. उर्वरित असलेल्या ११ प्रकरणांवर निर्णय झाला नसल्याची बाब समोर आली आहे.शासनाने ठरवून दिलेल्या नियमांतर्गत मृत पावलेल्या शेतकरी कुटुुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयाप्रमाणे मदत देण्यात आली आहे. यावर्षी एकूण ५ प्रकरणे निकाली काढून मदत देण्यात आली.-अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.