पवनारा परिसरातील प्रकार : शेतकरी कर्जाच्या खाईत, शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदनपवनारा (तुमसर) : उन्हाळी धान पिकांसह अन्य पिकांनाही पाण्याचा पुरवठा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. मात्र बावनथडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बघेडा जलाशयातून शेतकऱ्यांना पाण्याचे वाटप करण्यात आले नाही. पाणी वाटप संस्थेने पुढाकार घेतला नाही. परिणामी पवनारा परिसरातील शेतकऱ्यांचे उन्हाळी पिके पाण्याअभावी करपली आहेत.तुमसर तालुक्यातील बघेडा जलाशयातंर्गत पवनारा येथे जय किसान मध्यम पाणी वापर संस्था गर्रा (बघेडा) मार्फत पाणी वाटप केला जातो. उन्हाळी धान पिकाकरिता शेवटपर्यंत पाणी मिळेल, असे संस्थेने सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची १००.३० हेक्टरमध्ये लागवड केली. परंतु अंतिम टप्प्यात धान ओंबीवर असल्यामुळे पाण्याअभावी नष्ट झाले तर काहीचे पिके सुकले. यात ५० टक्के नुकसान होऊ न लाखोंचा फटका बसला यासाठी समितीच्या निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तुमसरचे तहसीलदार डी.टी. सोनवाने यांना निवेदन देऊ न नुकसान भरपाईची मागणी केली.बघेडा जलाशय गट नं. १५० आराजी १५७ एकर असून साठवण क्षमता ५.५० मीटर आहे. जानेवारी महिन्यात बावनथडी प्रकल्याचे पाणी बघेडा जलाशयात ५.५० मीटर पाणी सोडण्यात आले. जलाशयाअंतर्गत परिसरातील गावांना पाणी पुरवठा केला. परंतु पवनारा येथे शेतकऱ्यांला जबर फटका बसून लाखोंचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी बँक कर्ज, सावकारी कर्ज, उधारवाडी घेऊ न धान पिकाची लागवड केली.दररोजच्या महागाईमुळे खत, औषधी, मजूरी आदी खर्चामुळे प्रती एकर १८ हजार रुपये खर्च येतो. उत्पन्न २० हजार रुपयाच्या घरात पिकाचे ५० टक्के नुकसान झाल्यामुळे ना कर्जाची परतफेड करु शकत ना वर्षभर उदरनिर्वाह करु शकत. ही गंभीर समस्या शेतकऱ्यांच्या माथ्यावर पडली. याबाबद चौकशी करुन त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पवनारा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार सोनवाने यांना केली. (वार्ताहर)
पाण्याअभावी करपली उन्हाळी पिके
By admin | Published: May 27, 2016 12:53 AM