मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : हवामानाच्या अंदाजानुसार उन्हाळी धानासाठी नर्सरीची तयारी शेतकरी करीत आहेत. यासाठी उष्ण हवामानाची गरज आहे. परंतु डिसेंबर जानेवारीत तामपान १० अंशाच्या आसपास असते. त्यामुळे नर्सरी धानाची अपेक्षित उगवण होत नाही. हा प्रकार टाळण्यासाठी आता पालांदूर-मऱ्हेगाव परिसरात तंत्रशुद्ध पद्धतीने नर्सरीचा प्रयोग शेतकरी करीत आहेत.निसर्गाची अवकृपा आणि त्यातून येणारी सततची नापीकी यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यावर मात करण्यासाठी आता अनेक शेतकरी पुढे सरसावले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कृषी विभागाच्या योजनांचा पुरेपुर फायदा घेण्यासाठी शेतकरी आता तत्पर झाला आहे. ज्यांच्याकडे अपेक्षित पाणी आहे असे शेतकरी पालांदूर परिसरात दोन एकरात तरी उन्हाळी धानाची लागवड करतात. उर्वरीत जागेत कडधान्य आणि भाजीपाला पीक घेतात. परंतु थंडीच्या हंगामात पºह्याची उगवण क्षमता अपेक्षित होत नाही. तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव वाढतो. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आता शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने नर्सरी लागवड करीत आहेत. यात गादीवाफा तयार करून अपेक्षित उतार काढला जातो. सरळ रेषेत पट्टे तयार केले जातात. माती बारीक करून त्यात पाणी देऊन जमीन पूर्णत: पाण्याने भरून पाईपच्या आधाराने सपाटीकरण करून गादीवाफ्याचा उतार काढला जातो. त्यावर धान फेकून आवरणाकरिता राखड फेकली जाते. यामुळे धान उगवण होवून तीन ते चार दिवसातच अंकुर बाहेर येतात. यात धान सडण्याची अजीबात भीती नसते. पाणी चुकीने अधिक झाले तरी वाफ्याबाहेर पाटाने काढण्यासाठी अडचण येत नाही. यामुळेच शेतकरी आता या पद्धतीचा वापर करीत आहे.नव्या तंत्रज्ञानाने सजली नर्सरीनवे काहीतरी करण्याची जिद्द माणसाला प्रगतीकडे नेते. पारंपारिकतेकडून काही घेत त्यात नवे घालून प्रयोग केला जातो. त्यातूनच नवे तंत्रज्ञान हस्तगत होते. उन्हाळी धानाच्या संदर्भातही पालांदूर परिसरात शेतकऱ्यांनी हेच केले. आता त्यांना अपेक्षित उत्पादन येण्याची शक्यता आहे. पालांदूर परिसरात नव्या तंत्रज्ञानाने नर्सरी सजली आहे.पूर्णत: उगवण घेण्याकरिता हिवाळ्यात पाण्याची व थंडीची समस्या असते. कधीकधी तर पऱ्हे उगवतच नाही. उगवले तर वाढ होत नाही. यासाठी पदवीधर कृषीमित्रांनी आम्हाला दिलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवून उन्हाळी धानाची नर्सरी लावली आहे. त्यात धोका अजीबात दिसत नाही.-रवींद्र मदनकर, मऱ्हेगाव (जुना)थंडीमुळे अपेक्षित पºहे उन्हाळ्यासाठी घेणे अडचणीचे जाते. ही समस्या गेल्या कित्येक वर्षापासून आहे. मात्र अलिकडे कृषी विभागाच्या मदतीने आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाने नर्सरीची लागवड करीत आहोत. त्यामुळे यात धोका होण्याची कोणतीही शक्यता नसते. उलट रोगमुक्त पºहे लागवडीसाठी उपलब्ध होतात.-भाऊराव धकाते, पालांदूर (चौ.)
आधुनिक, तंत्रशुद्ध पद्धतीने उन्हाळी धानाची नर्सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 1:00 AM
हवामानाच्या अंदाजानुसार उन्हाळी धानासाठी नर्सरीची तयारी शेतकरी करीत आहेत. यासाठी उष्ण हवामानाची गरज आहे. परंतु डिसेंबर जानेवारीत तामपान १० अंशाच्या आसपास असते. त्यामुळे नर्सरी धानाची अपेक्षित उगवण होत नाही.
ठळक मुद्देशेतकरी प्रयोगशील : पालांदूर-मऱ्हेगाव परिसरात प्रयोग