शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सुंदरटोला येथे चुली पेटल्याच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 10:18 PM

गावाशेजारील तलावात कमळाची फुले तोडण्याकरिता गेलेल्या दोन बहिणीसह भावाचा रविवारी सायंकाळी तलावात बुडून करुण अंत झाला.

ठळक मुद्देहुंदके अन् आक्रोशाने सुंदरटोल्यात स्मशान शांतता : शोकाकूल वातावरणात तिन्ही भावंडांवर अत्यंसंस्कार

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गावाशेजारील तलावात कमळाची फुले तोडण्याकरिता गेलेल्या दोन बहिणीसह भावाचा रविवारी सायंकाळी तलावात बुडून करुण अंत झाला. मृत भावंडांवर सोमवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास शोकाकूल वातावरणात सुंदरटोला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.रविवारी सायंकाळी ५.३० वाजता मुस्कान धनराज सरीयाम (११), प्रणय धनराज सरीयाम (६) व सारिका छबीलाल सरीयाम (१०) यांचा गावाजवळील तलावात बुडून मृत्यू झाला. तलावात जाण्यापूर्वी तिघेही भावंड घरासमोरील अंगणात खेळत होते. खेळताखेळता ते तलावाकडे निघाले. सरीयाम कुटूंबीयांचे घर तलावापासून केवळ १०० मीटर अंतरावर आहे. प्रथम तिघांही भांवडानी कपडे काढले. तलावात शिल्यावर लहान भाऊ प्रणय सर्वात पुढे होता. तलावातील खड्यात तो गंटागळ्या खाताना दोन्ही बहिणींनी बघताच त्याला वाचविण्याकरिता त्या धावल्या. एकापाठोपाठ तिघेही भावंड गटांगळ्या खात पाण्यात बुडाले.सायंकाळी तलावाकडे जाताना स्थानिक नागरिकांनी त्यांना बघितले होते. सायंकाळी तिन्ही भावंड घरी न दिसल्याने शोधाशोध सुरु झाली होती. तलावाच्या काठावरील कपड्यावरुन त्यांची ओळख पटली. गावातील युवकांनी शोधमोहीम राबवून त्यांना बाहेर काढले. परंतु बराच उशिर झाला होता. रविवारी सायंकाळी व सोमवारी सुंदरटोलात स्मशानशांतता पसरली होती.तीन भावंडाच्या मृत्यूमुळे संपूर्ण सुंदरटोल्यावर शोककळा पसरली होती. रविवारी सुंदरटोल्यात चुली पेटल्या नाही. रात्री तिघांचे मृतदेह तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांचे शवविच्छेदन पोहचताच मुस्कान, सारीका व प्रणय च्या आई वडील व कुटूंबियांनी एकच हंबरडा फोडला तेव्हा उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाही. कुटूंबीय चिमुकल्यांच्या आठवणींना उजाळा देत ओक्साबोक्सी रडत होते. खेळता खेळता तलावाकडे कसे गेले हाच प्रश्न त्यांच्या तोंडून अनेकदा उच्चारला गेला.मुस्कान ही तुमसर येथील जनता शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होती. अभ्यासात ती अतिशय हुशार होती असे शिक्षकांनी सांगितले. सारीका ही इयत्ता चवथीत तर प्रणय सुंदरटोला येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत होते. संपूर्ण सुंदरटोला येथे आक्रोश, हुंदके कानी पडत होते. तिन्ही भावंडाचे आई व वडील नि:शब्द झाले होते.गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो, पंरतु सरीयाम कुटूंबावरील शोककळेने गणपवती उत्सवावर विरजन पडले. नियमित शाळेत जाणारी मुस्कान आपल्यात आज नाही यावर वर्गमित्राचा प्रथम विश्वासच बसला नाही. रविवार नसता तर मुस्कान नक्कीच शाळेत हजर असती अशा प्रतिक्रीया विद्यार्थीनीनी व्यक्त केल्या. सुंदरटोला येथील तलावात खड्डे पडले आहेत. त्या खडड््यानीच तिन्ही भावंडाचा जीव घेतल्याची प्रतिक्रिया उमटत होती.शिक्षकांकडून आर्थिक मदतजनता विद्यालयात शिकणाºया मुस्कान सरीयामच्या कुटुंबाला शिक्षकांनी १० हजारांची आर्थिक मदत दिली. सोमवारी सुंदरटोला शाळेतील अनेक शिक्षकांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचाही त्यात समावेश आहे. सौजन्य म्हणून कोणतेही अधिकारी येथे आले नाही. केवळ तलाठी उपस्थित होते. तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, जिल्हा परिषद सदस्य के. के. पंचबुध्दे, चिखलाचे सरपंच दिलीप सोनवाने, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, अनिल टेकाम, माजी पं.स. सदस्य प्रभा पेंदामसह पदाधिकाºयांनी भेट दिली होती. आदिवासींच्या मुलांचा मृत्यू झाला. यापूर्वी समिती प्रमुख जिल्हास्तर होते. सध्या ते पद रिक्त असल्याने आकस्मीक निधी म्हणून यापूर्वी १० हजारांची आर्थिक मदत केली जात होती. परंतु ती मदत सरियाम कुटुंबाला मिळाली नाही. असा आरोप अशोक उईके यांनी केला. मृत बालकांच्या कुटुंबियाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी चिखला येथील सरपंच दिलीप सोनवाने, माजी जि.प. सदस्य अशोक उईके, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, माजी पं.स. सदस्य प्रभा पेंदाम व अनिल टेकाम यांनी केली आहे.