लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कर्तव्याबाबत कसुरी अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवू नये यासाठी १४ हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारताना सेंदुरवाफा येथील स्वावलंबी अपंग औद्योगिक निवास कर्मशाळेच्या अधीक्षकाला पकडण्यात आले. शरदचंद्र मोतीराम बारसागडे असे गुन्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकीय अधीक्षकाचे नाव आहे.माहितीनुसार तक्रारदार हे ७५ टक्के अपंग असून २००२ पासून सेंदुरवाफा येथील सदर निवासी कर्मशाळेत काळजीवाहक या पदावर कार्यरत आहेत. अपंग असल्याने त्यांच्याबाबतचा कसुरी अहवाल समाजकल्याण कार्यालयात पाठवू नये व नोकरीवरुन कमी न करण्यासाठी प्रति महिना ५ हजार रुपये व उर्वरित महिन्यांचे असे मिळून १४ हजार ६०० रुपयांची लाच अधीक्षक बारसागडे यांनी मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने काळजीवाहकाने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांच्याकडे नोंदविली. यासंबंधाने सापडा रचून शुक्रवारी लाचेची रक्कम स्विकारल्यावरुन बारसागडे यांना पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, हवालदार संजय कुंरजेकर, पराग राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, शेखर देशकर, श्रीकांत हत्तीमारे, धार्मिक यांनी सहभाग नोंदविला.
१४ हजारांची लाच घेताना अधीक्षकाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:19 AM
कर्तव्याबाबत कसुरी अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवू नये यासाठी १४ हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारताना सेंदुरवाफा येथील स्वावलंबी अपंग औद्योगिक निवास कर्मशाळेच्या ...
ठळक मुद्देएसीबीची कारवाई : स्वावलंबी निवासी कर्मशाळेचा कर्मचारी