कुंभली यात्रा : बुवाबाजी जादुटोणावर मार्गदर्शनसाकोली : कुंंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राज्य सरकारी कर्मचारी संघटना शाखा साकोलीच्या वतीने एकदिवशीय अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन शिबिर व जादुटोना विरोधी कायदा या विषयावर जनप्रबोधन घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय अंनिस जिल्हा अध्यक्ष मदन बांडेबुचे होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक जगदिश गायकवाड, जिल्हा परीषद सदस्य अशोक कापगते, गोंदिया जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे, जिल्हा अध्यक्ष गोंदियाचे एस.एस. चव्हाण, भंडारा जिल्हा उपाध्यक्ष डी.जी. रंगारी, राज्य सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष राम येवले, सचिव मधुकर कुकडे, रत्नाकर तिडके, प्रा. अशोक गायधने, महिला संघटिका प्रिया शहारे, किर्ती गणवीर, कीर्तनकार ग्यानचंद जांभुळकर आदी उपस्थित होते.प्रथम सत्रात उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे, पोलीस निरीक्षक जगदिश गायकवाड, डॉ. प्रकाश धोटे, मदन बांडेबुचे, डी.जी. रंगारी, प्रिया शहारे, किर्ती गणवीर, रत्नाकर तिडके यांनी तांत्रिक, बुवा बाबा कशी फसवणूक करून जादुटोनाच्या भूत, भानामती सांगून अंधश्रद्धा परसविण्याचे काम करतात व ढोंगी देवी अंगात आणून लुबाडणूक करतात. यापासून नागरिकांनी सावध असावे, असे सांगितले. वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक वृत्ती कशी निर्माण होईल, याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात वैज्ञानिक प्रयोग व जादुटोना विरोधी कायदा याविषयी प्रात्याक्षिकातून ढोंगी देवी, बाबा कसे फसवितात, या विषयावर एस.एस. चव्हाण, डी.जी. रंगारी, प्रोफेसर बहेकार, ग्यानचंद जांभुळकर यांनी नारळातून पैसे काढणे, हवेतून सोन्याची चैन काढणे, लिंबातून रक्त काढणे, तोंडातून ब्लेड काढणे, कानाने चिठ्ठ्या वाचणे असे अनेक प्रयोग सादर करून लोकामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलनावर तालुका संघटक कागदराव रंगारी यांनी जनजागृतीचे गीत सादर केले. तसेच जादुटोना, भूत, भानामती, तंत्रमंत्र, देवी अंगात येणे, सिद्ध करणाऱ्यास २१ लाखाचे बक्षिस देण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु एकाही देवीने आवाहन स्विकारले नाही. प्रास्ताविक भाषण जिल्हा उपाध्यक्ष डी.जी. रंगारी यांनी तर संचालन तालुका अध्यक्ष प्रोफेसर बहेकार यांनी केले. आभार सचिव यशवंत उपरीकर यांनी मानले. कार्यक्रमाकरीता डी.जी. रंगारी, कागदराव रंगारी, यशवंत उपरीकर, भाऊदास मेश्राम, कल्पना सांगोडे, आशा वासनिक, भारती रंगारी, विजय देवगिरकर, अनिल किरणापुरे, राजु बन्सोड, घनश्याम लंजे, गणेश नागपुरे, किशोर गडकरी व बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन शिबिर
By admin | Published: January 19, 2017 12:30 AM