शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'बालभारती'कडून भंडारा, पवनी, लाखांदूर व तुमसर तालुक्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 3:52 PM

उर्वरित पुरवठा लवकरच; ८६,८९४ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच मिळणार पुस्तके

देवानंद नंदेश्वर, भंडारा : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्ह्यातील तब्बल ८७,८९४ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके हातात पडतील, असे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. आतापर्यत 'बालभारती'कडून भंडारा, पवनी, लाखांदूर व तुमसर तालुक्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असून उर्वरित पुरवठा लवकरच होणार आहे. जिल्ह्यातील ८६,८९४ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच पुस्तके वितरीत करण्यात येतील.

जिल्ह्यातील शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. यंदाही शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे ८७ हजार ८९४ इतके विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेवर मिळण्यासाठी नियोजन असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वर्षा बेले यांनी सांगितले. यावर्षी एकात्मिक स्वरूपात पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. एकाच संचामध्ये इंग्रजी, गणित यासह इतर विषय असणार आहेत. ही पुस्तके इंग्रजी माध्यमाच्या स्वंयअर्थसाहाय्यित शाळा सोडून इतर सर्व शाळांना वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.

तालुकानिहाय विद्यार्थी - पुस्तकांची संख्या - तालुका लाभार्थी पुस्तकांची मागणी

  • भंडारा - १७७३५ - ७४१२९
  • लाखांदूर - १०२४३ - ४२१७८
  • लाखनी - ११०५० - ४६०००
  • मोहाडी - १०९०८ - ४५३१७
  • पवनी - १२४४५ - ५१७४४
  • साकोली - १०२०२ - ४२५४७
  • तुमसर - १५३११ - ६३७४१

एकूण - ८७८९४ - ३६५६५६

बालभारतीकडून झाला पुस्तक पुरवठा

पाठ्यपुस्तकाचे संच नागपूर येथील बालभारती कार्यालयातून भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्यांना १५ मे पासून पुरवठा करण्यात आले आहेत. उर्वरित तीन तालुक्यांना लवकरच पुरवठा केला जाणार आहे. या पाठ्यपुस्तके जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे येत आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पुस्तके स्वाधीन केल्यानंतर पुस्तकांचे तालुकास्तरावर प्रत्येक शाळेत वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षण