परिणय फुके यांचा पुढाकार : क्रीडा अधिकाऱ्यांना सूचनाभंडारा : भंडारा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात उन्हाळी क्रीडा शिबिर सुरू आहे. यात आर्चरिच्या खेळाडूंना होणाऱ्या त्रासाची माहिती मिळताच आमदार परिणय फुके यांनी थेट क्रीडांगण गाठून जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांना सूचना देत खेळाडूंना पाठबळ दिले.क्रीडांगणावर खेळाडूंना सराव करण्यासाठी होत असलेला त्रासाची माहिती आमदार फुके यांनी जाणुन घेतली. जिल्हा क्रीडा अधिकारी बिले यांना सांगितले की, आॅर्चरीच्या सराव करणाऱ्या खेळाडूंना इतरत्र कुठेही न हलविता त्याच ठिकाणी त्यांना सराव करु द्यावा जेणेकरुन खेळाडूंना प्रगती साधता येईल. व्हॉलीबॉलचे एक मैदान असताना दुसऱ्या मैदानाची आखणी करण्यात येत होती. यावरही त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आता आर्चरीच्या खेळाडूंना सराव करण्यासाठी त्यांच्या हक्काचे मैदान उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळालेला आहे. आमदार परिणय फुके यांनी सरावाच्या वेळीच भेट दिल्याने. त्यानीही आर्चरीचे एआयएम धरला व यापुढेही या खेळाडूंना प्रोत्साहन देऊ आणि त्यांचे पाठीशी उभे राहु असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
आर्चरीच्या खेळाडूंना पाठबळ
By admin | Published: April 20, 2017 12:43 AM