साकोलीत शुक्रवारी तालुका सरपंच संघटनेच्यावतीने आयोजित नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच संघटना अध्यक्ष पवनकुमार शेंडे, सचिव प्रेमकुमार गहाणे, उषा डोंगरवार, शालिक खर्डेकर, पतिराम भेंडारकर, यादवराव कापगते आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी वानखेडे यांनी एकात्मतेच्या बंधूभावातून सर्व सरपंच यांच्या गावातील समस्यांचे नियमानुसार निवारण करण्यात येईल असे सांगितले. प्रास्ताविक प्रेमकुमार गहाणे यांची केले. कार्यक्रमात साकोली तालुका सरपंच संघटनेकडून पं.स गटविकास अधिकारी वानखेडे यांचा व सर्व नवनिर्वाचीत सरपंचांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला. संचालन संघटनेच्या उपाध्यक्षा नैना चांदेवार यांनी केले. कार्यक्रमात ५५ ते ६० तालुक्यातील सत्कारमूर्ती सरपंच उपस्थित होते. आभार प्रदर्शन सरपंच भिमावती पटले यांनी केले
गावविकासासाठी सरपचांच्या पाठिशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:41 AM