लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत सीतासावंगी येथे उघडकीस आलेल्या वाघ शिकार प्रकरणी एका आरोपीने बुधवारी आत्मसमर्पण केले असून त्याच्या जवळून वाघ नख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आता आरोपींची संख्या १४ झाली आहे.विक्रम राजेंद्र गुप्ता (३०) रा.निर्मल नगरी नंदवन नागपूर असे आत्मसमर्पण केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे औषधी विक्रीचे दुकान आहे.तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे रानडुकराच्या शिकार प्रकरणातून वाघाच्या शिकारीचे बिंग फुटले होते. तब्बल तीन वाघ मारल्याचे वनविभागाच्या चौकशीत पुढे आले. या शिकाऱ्यांजवळून २२ वाघनखे जप्त करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात अनेक आरोपी असल्याचा संशय होता. वनविभाग आरोपींचा शोध घेत होते. मध्यप्रदेशातही शोध मोहीम राबविण्यात आली. परंतु हाती काही लागले नाही.दरम्यान बुधवारी सकाळी १० वाजता विक्रम गुप्ता याने वनविभागापुढे आत्मसमर्पण केले. त्याने एक वाघनख वनविभागाच्या हवाली केले. त्याला तात्काळ वनविभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय तपास करीत आहेत.
वाघ शिकार प्रकरणी एका आरोपीचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:52 AM
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत सीतासावंगी येथे उघडकीस आलेल्या वाघ शिकार प्रकरणी एका आरोपीने बुधवारी आत्मसमर्पण केले असून त्याच्या जवळून वाघ नख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आता आरोपींची संख्या १४ झाली आहे.
ठळक मुद्देसीतासावंगीचे प्रकरण : वाघनख जप्त, आरोपीची संख्या झाली १४