शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

ढोलताशांच्या गजरातून गणरायाला वंदन

By admin | Published: September 26, 2015 12:28 AM

हल्ली रोजगारासाठी कामांचा शोध घ्यावा लागतो. रोजगारांचे साधन मिळविल्यानंतर अंगात कलागुण असले की गुणातून ती कला जनतेसमोर प्रकट करतात.

नागरिकांनी दिली दाद : नागपूरच्या हौसे कलावंतांचा भृशुंड गणपतीला मानाचा मुजरा, वाद्याने आसमंत दुमदुमलाभंडारा : हल्ली रोजगारासाठी कामांचा शोध घ्यावा लागतो. रोजगारांचे साधन मिळविल्यानंतर अंगात कलागुण असले की गुणातून ती कला जनतेसमोर प्रकट करतात. असेच नागपुरातील काही तरुण मंडळी एकत्र आले आणि आपल्या कलागुणांना छंदाच्या माध्यमातून जनतेसमोर आणले. त्या मंडळातील प्रत्येक तरुण शासकीय, निमशासकीय नोकरी सांभाळून केवळ हौसेखातर ‘स्वराज्य गर्जना ढोल-ताशा’ पथक स्थापन केला. आज शुक्रवारला या पथकाने भंडाऱ्याचे आराध्य दैवत भृशुंड गणपती मंदिरात ‘गणराया’ला ढोल ताशा वाजवून वंदन करताना हजारो लोकांची दाद मिळविली.ढोलताशा म्हणजे महाराष्ट्राच्या मायमराठीचा संगीतमय वारसा. तरुण पिढीचा स्मृतीमय पण पारंपरिक जल्लोष, गणेशोत्सवाचे बिभत्स स्वरुप पाहता गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत शिस्तबध्दता, पारंपरिकता, रचनात्मकता आणि सौंदर्य असावे या हेतूने नागपूरचे हे समविचारी तरुण एकत्र आले आणि या ध्येयवेड्या तरुणांनी २०१२ मध्ये त्यांनी ‘स्वराज्य गर्जना ढोल-ताशा’ पथकाची निर्मिती केली. विदर्भातील हे पहिले पथक असून यात शासकीय तथा निमशासकीय विभागात लहान मोठ्या पदावर असलेल्या तरुण व तरुणींचा समावेश असून ते केवळ हौसेखातर या पथकात दाखल झाले आहेत.या पथकाकडे ३५ ढोल, १० ताशे एक टोलगाडी, एक शंख, दोन झांझ आदी साहित्य आहे. महिलांना संधी मिळावी या हेतूने पथकात १५ मुलींचा सहभाग आहे. या मुलीही तरुणांच्या ताकदीने ढोल पिटताना पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले. यातून महिला कुठेही मागे नसल्याचे या तरुणींनी दाखवून दिले.पथकाचा मानबिंदू म्हणजे ध्वज उंच फडकविला जात होता. सामाजिक बांधीलकी जोपासणारे हे पथक आपले समाजाला काही देणे लागते या उदात्त हेतूने कार्य करीत आहेत. या पथकाला मिळणाऱ्या मानधनापैकी काही मानधन सामाजिक कार्यात खर्च केला जातो. यामध्ये वृध्दाश्रमाला देणगी, २६ जानेवारीला अभिमान तिरंगाचा उपक्रम, रामनवमी शोभायात्रेत प्रसाद वितरण, गुढीपाडवा पहाट आदी उपक्रम या माध्यमातून राबविले जात असल्याचे ‘स्वराज्य गर्जना ढोल-ताशा’ पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)