लाखांदूर : तालुक्यातील सरांडी बुज. येथील शेतातील विहिरीत पडलेल्या एका कोल्ह्याला गावकऱ्यांच्या मदतीने वनविभागाने जीवदान दिले. सोमवारी दुपारी वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला विहिरीबाहेर काढून जंगलात सोडून दिले.
सरांडी येथील राकेश बुराडे यांच्या शेतातील विहिरीत तीन वर्षीय कोल्हा पडला. हा प्रकार लक्षात येताच शेतमालकाने याची माहिती लाखांदूर वनविभागाला दिली. लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात गस्ती पथकाचे वनपाल के. आर. पिल्लेवान, वनरक्षक एस. जी. खंडागळे ,वाहनचालक प्रफुल राऊत, वनमजूर पांडू दिघोरे, हरिश्चंद्र समरत यांनी घटनास्थळ गाठले. गावकऱ्यांच्या मदतीने कोल्ह्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. नंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले.
बॉक्स
गावात शिरले चितळ
चाऱ्याच्या शोधात एक चितळ लाखांदूर तालुक्यातील राजनी येथे सोमवारी दुपारी आले. गावात येताच घाबरलेल्या चितळाने अशोक ठाकरे यांच्या घरात शिरले. गावात चितळ आल्याची माहिती होताच ठाकरे यांच्या घरासमोर एकच गर्दी झाली. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन पथकाने चितळाला पकडून जंगलात सोडून दिले.
===Photopath===
150621\img-20210614-wa0053.jpg
===Caption===
चितळाला पकडुन जिवंत जंगलात सोडण्यासाठी नेतांना वन अधिकारी कर्मचारी