लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत तीन ते चार वर्षापासून बाजार समितीच्या कर्मचाºयांना अर्जित रजा, महागाई भत्ता, अन्य भत्ता, दिवाळी बोनस आदीचे काहीच पैसे न मिळाल्याने बाजार समितीला न्यायालयामार्फत पत्र पाठविल्यामुळेच बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावून निलंबित केले, असा आरोप तेथील कर्मचारी आशिष चौरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.या संदर्भात माहिती देताना चौरे म्हणाले की, १४ मे २०१७ पासून मला वे-ब्रिजचे काम सोपविण्यात आले होते. माझ्यासह अन्य दोन पुर्णवेळ कर्मचारी व ३ रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त केले गेले होते. सदर वे-ब्रिजवर दोन पाळीत कार्य सुरू होते. त्यामुळे त्या त्या पाळीतल्या कर्मचाºयाजवळ हिशोब राहायचा. मात्र कर्मचारी एकत्र न भेटत असल्यामुळे धर्मकाट्यावरची वसूलीचा हिशोब लांबणीवर गेला. दरम्यान सभापतीच्या सांगण्यावरून त्यांच्या सोबत २० ते २५ दिवस दौरावर होतो. त्यामुळे त्यादिवशीचा हिशोब माझ्याकडे नव्हता. त्या दरम्यान ३ जुलैला न्यायालयाद्वारे बाजार समितीला पत्र पाठवून कर्मचाºयांचे अर्जित रजा, एरियर्स, दिवाळी बोनस, डी.ए. इंक्रिमेंट आदी का देण्यात आले नाही ते देण्यास टाळाटाळ का होत आहे, अशी विचारणा केल्यामुळे बाजार समितीचे प्रशासन खळबळून जागे झाले. मला शांत करण्याकरिता अडीच महिन्यानंतर धर्मकाट्याचा हिशोब मागण्याची जाग आली. धर्मकाट्याचा हिशोब दररोज सादर करावे किंवा कसे याबाबत कोणतेही लेखी आदेश दिले नव्हते तरी देखिल ३१ जुलै चे कार्यालयीन पत्रानुसार तीन महिन्यापासून धर्मकाट्याची रक्कम कार्यालयात जमा केली नाही याबाबद तीन दिवसात खुलासा मागितला.मात्र २ व ३ आॅगस्टला रजेवर होतो व ३ आॅगस्ट रोजी माझा ब्लड प्रेशर व मधुमेह वाढल्याने मी कार्यालयात जावू शकतो नव्हतो. तरी देखिल ३ आॅगस्टलाच एका पत्राद्वारे धर्मकाट्यावर वेगवेगळे लोक असल्यामुळे हिशोब देण्यास अडचण होत आहे. माझ्याकडे असलेले पैसे हे सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यानुसार ९ आॅगस्टला धर्मकाट्यावर वसुल झालेली एकूण २५ हजार ८७० रूपये कार्यालयात जमा केले तशी पावती आहे. त्यानंतर मला धर्मकाट्यावरून हटवून मार्केट यार्डवर नौकरी करण्याचे आदेश ४ आॅगस्टला दिले व त्याच दिवशी दुसरापण काढून तुम्ही विहित दिवसात हिशोब सादर केला नाही. करिता २४ तासाची मुदत देऊन तो पत्र मला डाकने पाठविले. सदर पत्र ७ आॅगस्टला मिळाला व ८ आॅगस्टला पैसे जमा केल्याच्या पावतीसह भ्रष्टाचार झाला नसल्याचा खुलासा सादर केला. परंतू तो खुलासा असमाधानकारक असल्याचा देवून मला १० आॅगस्टपासून एकट्यालाच निलंबित केले. या बाकीचेही कर्मचारी असताना माझ्यावर कारवाई का, असा सवाल उपस्थित करून प्रशासनाने माझे निलंबन मागे न घेतल्यास आठ दिवसानंतर बाजार समिती पुढे आमरण उपोषणाला बसून हक्काची लढाई लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराचे आरोप लावून केले निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:59 PM
गत तीन ते चार वर्षापासून बाजार समितीच्या कर्मचाºयांना अर्जित रजा, महागाई भत्ता, अन्य भत्ता, दिवाळी बोनस आदीचे काहीच पैसे न मिळाल्याने ......
ठळक मुद्देआरोप : आमरण उपोषणाचाही दिला इशारा