शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

१४ दिवसांत दोन वनकर्मचारी निलंबित

By admin | Published: August 22, 2016 12:35 AM

भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत कार्यरत दोन वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात : वनरक्षक, वरिष्ठ लिपिकाचा समावेश, उपवनसंरक्षकांचा ‘इगो हर्ट ’झाल्याचा आरोपभंडारा : भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत कार्यरत दोन वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई १४ दिवसांत करण्यात आल्याने वनकर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी ही कारवाई केली असून या कारवाईविरुद्ध वनकर्मचाऱ्यांची संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयात उपवनसंरक्षक म्हणून उमेश वर्मा हे काही दिवसापूर्वी भंडारा येथे रूजू झाले. त्यांनी आल्याआल्यात दोन वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. केवळ ‘इगो हर्ट’ झाल्यामुळे ही कारवाई केल्याचा आरोप आता वनकर्मचारी संघटनेने केला आहे. या कारवाईत वनरक्षक बी.एस. कुंभारे व एच.वाय. धार्मिक यांचा समावेश आहे. वनरक्षक बी.एस. कुंभारे हे उपवनसंरक्षक कार्यालयातील कॅम्प हाऊस येथे कर्तव्यावर होते. दरम्यान त्यांच्याकडे माडगी - २ क्षेत्राचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला. यासाठी त्यांना वर्मा यांनी आदेश बजावले. मात्र वर्षभरापूर्वीच एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने त्याने त्यांनी भंडारा येथे बदली करून घेतली होती. त्यातच पत्नीही आजारी राहत असल्याने व त्यांनाही मधुमेहाचा त्रास असल्याने माडगी येथे रूजू होण्याच्या आदेशाबाबत एक दिवसाचा अवधी द्यावा अशी विणवणी कुंभारे यांनी केली होती. मात्र उपवनसंरक्षक वर्मा यांनी त्यांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा राग धरून ५ आॅगस्ट ला कुंभारे यांना निलंबनाचे आदेश बजावले. विशेष म्हणजे वर्मा यांनी १ आॅगस्टला माडगी क्षेत्राचा अतिरिक्त प्रभार घेण्याचा आदेश बजावला होता. परंतु प्रकृती अस्वस्थतेमुळे कुंभारे हे वैद्यकीय रजेवर असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. भंडारा वनविभागाची आढावा बैठक १८ आॅगस्टला घेण्यात आली. या बैठकीला वनविभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान कामाच्या नियोजनाच्या अंदाजपत्रकावरून धार्मिक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. एका वनपरिक्षेत्रात करण्यात येणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी नियोजन विभागाकडे पाठविण्यात आले होते. सदर वनक्षेत्राधिकाऱ्याने सदर अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असून वनविभागाकडे प्रकरण रखडले असून वरिष्ठ लिपिक धार्मिक याला जबाबदार असल्याचा आरोप लावण्यात आला होता. तर धार्मिक यांनी सदर अंदाजपत्रक प्राप्त झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांना बैठकीत दिली. या प्रकरणात कुठल्याही प्रकारची शहानिशा किंवा त्यांना संधी न देता उपवनसंरक्षकांनी त्यांच्यावरही तातडीने निलंबनाची कारवाई केली. या कारवाईविरुद्ध महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असून उद्या सोमवारला या महत्वाच्या विषयावर संघटनेची बैठक बोलाविली आहे. यात निर्णय घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)दोघांनाही संधी देणे गरजेचेवनरक्षक डी.एस. कुंभारे व वरिष्ठ लिपिक एच.वाय. धार्मिक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोघांनाही त्यांची बाजू ऐकून घेणे किंवा तशी संधी देणे क्रमप्राप्त होते. मात्र कुंभारे व धार्मिक यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुडबुद्धीने व अन्यायपूर्वक असल्याची चर्चा वनकर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. महाराष्ट्र नागरी कायदा १९७९ च्या नियम ८ अन्वये शिस्तभंग केल्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई नियमानुसार करण्यात आली असून ती योग्य आहे. - उमेश वर्माउपवनसंरक्षक, भंडारा.वनकर्मचाऱ्यांना संधी देण्यात आली नाही. दोघांवरही करण्यात आलेली कारवाई अन्यायपूर्वक आहे. त्यांचे निलंबन मागे न घेतल्यास संघटना आंदोलनाची दिशा ठरवेल.- टी.एच. घुलेजिल्हाध्यक्ष, वनकर्मचारी संघटना