भंडारा : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत येथील नूतन कन्या शाळेच्या ५३ विद्यार्थिनी परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. या परीक्षेत एकूण १४ विद्यार्थिनी पास झालेल्या असून समृद्धी राजेश सरादे या विद्यार्थिनीला १३७ गुण मिळाले आहेत. समृद्धीची निवड राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी झाली आहे. या विद्यार्थिनींचे कौतुक करण्याकरिता शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर यांनी शाळेला भेट देऊन समृद्धीचे व सोबत असलेल्या तिच्या पालकांचे रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन कौतुक केले. मंजूषा धोटे, शीतल नागपुरे यांचेही झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी डोर्लीकर व समृद्धी राजेश सराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी नितीन वाघमारे उपस्थित होते. प्रस्ताविक मुख्याध्यापिका सीमा चित्रीव यांनी केले. संचालन मंजूषा धोटे यांनी तर आभार शीतल नागपुरे यांनी केले. यशस्वी विद्यार्थिनींमध्ये आर्या विलास धाबेकर, पायल सुरेश मेहर,चेल्सिया, धनलाल कंगाले, गौरी संतोष सावरगावकर, आयुषी सुभाष बांते, दीप्तिका जगदीश बावनकर, वैभवी संजय राऊत, श्रेयांशी राजू सेलोकर, राणी कृष्णा बांते, संजना संजीव मेश्राम, कशीष दरिया हुमणे, जान्हवी अश्विन रामटेके, जयश्री गुलाब डहाके यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव बोंगीरवार, सचिव ॲड. एम. एल. भुरे, सहसचिव शेखर बोरसे, उपमुख्याध्यापिका नीलू तिडके, पर्यवेक्षिका सुरेखा डुंभरे यांनी कौतुक केले.
प्रज्ञाशोध परीक्षेत नूतन कन्या शाळेचे सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:23 AM