शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

आदिवासीचे पुनर्वसित गावातून स्वगावी पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 10:31 PM

बावनथडी प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या आदिवासी बहुल कमकासुर गावाचे पुनर्वसन शासनाने बंदुकीच्या नोकावर तालुक्यातील रायपूर नजीकच्या टोलीवर केले.

ठळक मुद्देप्रशासनात खळबळ : जगणे झाले होते कठीण

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या आदिवासी बहुल कमकासुर गावाचे पुनर्वसन शासनाने बंदुकीच्या नोकावर तालुक्यातील रायपूर नजीकच्या टोलीवर केले. मात्र पुनर्वसन झाल्यापासून ते आजपर्यंत शासनाने वीज, पाणी, धान्य, रोजगार, शिक्षण सारखी कोणती नागरी सुविधा न पुरविल्याने त्या ठिकाणी आदिवासीचे जगणे कठीण झाले होते. परिणामी आता मरण आले तरी बेहतर परंतु स्वगावीच जायचे असे एकमत झाल्याने पुनर्वसित कमकासूरवासीयांनी त्या गावातून लेकराबाळासह गुरूवारी स्वगावी पलायन करताच प्रशासनात एकच खळबळ माजली.बावनथडी प्रकल्पाची गळभरणी करते वेळी कमकासूर येथील आदिवासीयांना कोणताही मोबदला आधी न देता बंदुकीच्या नोकावर सळो की पळो करीत बळजबरीने आदिवासीयांना गावाबाहेर काढले. ज्या पद्धतीने, त्यांना गावाबाहेर काढले त्या पद्धतीनेच शासनाने त्यांच पुनर्वसन करून आवश्यक ती सुविधा पुरविणे गरजेचे होते. मात्र तसे काहीच झाले नाही. त्यामुळे त्यांना टिनाच्या शेडमध्ये जीवन जगावे लागले. रायपूर नजीक करण्यात आलेल्या पुनर्वसन गावात सुरुवातीपासूनच विद्युतची व्यवस्था नाही. सुसुरडोह गट ग्रा.पं. मध्ये येत असलेला कमकासूर हे गाव १५ कि.मी. अंतरावर असल्याने ग्रा.पं. चे दुर्लक्ष होते आहे. इतकेच नव्हे तर स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य हे स्वस्तात मिळत नाही. गावातील नाल्याचे कधीच उपसा होत नसल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. कमकासूर हे गाव १०० टक्के आदिवासी आहे. कायद्यानुसार आदिवासी यांना भूमीहीन करता येत नाही. पुनर्वसन झालेल्या आदिवासीयांना बेघर व भूमीहीन बनविले आहे. त्यांना कोणत्याही जमिनीचे पट्टे देण्यात आले नाही.पुनर्वसन गावातही रानटी प्राण्यांच्या दहशतीतच जीवन जगत आलो. पलायनानंतरही झाडांच्या आडोशाला संसार थाटून कमीत कमी जीवन जगू.-किशोर उईके, सरपंच, कमकासूर.पुनर्वसन गावातून आदिवासींनी पलायन करू नये म्हणून मी लक्ष्मीकांत सलामे, अनिल टेकाम यांच्यासह गेलो. शासनाने आदिवासीयांच्या समस्येकडे त्वरीत लक्ष घालावे अन्यथा इथे प्रकरण वेगळे वळण घेऊ शकते.-अशोक उईके, आदिवासी नेता व माजी जि.प. सदस्य.महसूल विभागाचे कर्मचारी कमकासूर येथे पाठविले आहे.-निलेश गौंड, ना.तहसीलदार तुमसर.