कोरोनाने अनेकांच्या जीवनात वाईट दिवस आणले, तरी जीवनचक्र सुरू आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉक्टरांनी जीव वाचविण्यासाठी धडपड केली. शास्त्रज्ञ लसी काढण्यासाठी जीवाचे रान करीत होते. अखेर लस आली. पण, लस घेण्यास ग्रामीण जनता टाळत आहे. हाच धागा पकडून हनुमान व्यायाम मंडळ यावर्षी लसीकरण हा विषय पकडून गणेशोत्सवात प्रबोधन करीत आहे. या माध्यमातून मोहगावात ७५ टक्के नागरिकांनी कोविड-१९ प्रतिबंधक लस घेतली आहे.
कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका, पोलीस या घटकांनी जीवावर उदार होऊन कसे कार्य केले, त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी डॉ. गोपाल मडामे, नमन डोकरीमारे, पोलीस मुकेश साठवणे, परिचारिका तनुजा लेंडे, आशाताई यांच्या वेशात आरोशी चकोले व तरुणांनी कोविड काळात योद्यांची भूमिका कशी पार पाडली. गावात पथसंचलन करण्यात आले. गावात जागोजागी या प्रतिरुप कोविड योद्यांचे औक्षण व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावर्षी गणेश बाप्पा डॉक्टर बनले आहेत. गणेश मूर्तीच्या मंडपात कोविड हॉस्पिटल उभारले गेले आहे.
बाॅक्स
विविध स्पर्धा
उत्सवादरम्यान एकल नृत्य स्पर्धा, फॅशन शो स्पर्धा एकपात्री, खुली सामूहिक सुपर स्टार स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, मुक्त हस्तकला स्पर्धा, कोरोनाकाळात माझी जबाबदारी निंबध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मोफत आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रमांची रेलचेल आहे. मंडळाचे रामकृष्ण चकोले, नरेश दिपटे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष महेश लेंडे, उपाध्यक्ष अविनाश साठवणे, सहसचिव राहुल चकोले, विकास बाळबुधे, नाना लेंडे, श्रीकांत साठवणे, राजू वाडीभस्मे, दादाराम साठवणे, नितीन जांगळे, वसंत चोपकर, श्रावण बाळबुधे, ओमेस्वर पडोळे, नीलेश लांबट, श्रावण चकोले, धनलाल भाजीपाले, संतोष लांबट, नरेंद्र निमकर, भगवान लेंडे, श्रावण डोकरीमारे, कोमेश लवकर, मनोहर ठवकर, राजेश लेंडे, रामा लांजेवार, मुलचंद आंबीलकर या तरुणाईने गणेशोत्सवात समाज प्रबोधनाचा वारसा जपला आहे.
140921\img-20210911-wa0078.jpg
गणेश मंडपात उभारला चक्क कोविड हॉस्पिटल
प्रबोधनाचा वारसा:व्यायाम शाळेचा पुढाकार