शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून केला पेट्रोल दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:36 PM

देशात पेट्रोल व डिझेलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किंमतीमुळे महागाईच्या दरात सातत्याने वाढ होत असून याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांचे नेतृत्त्व : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशात पेट्रोल व डिझेलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किंमतीमुळे महागाईच्या दरात सातत्याने वाढ होत असून याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी दुपारी १ वाजता गोंदिया येथे वाहनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा व सायकल रॅली काढण्यात आली. यात सहभागी सर्वसामान्य नागरिकांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सायकल रॅली व वाहनाच्या प्रतिकात्मक प्रेत यात्रेला सुरूवात करण्यात आली. यावेळी नागरिकांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर उपविभागीय कार्यालयात सरकारने पेट्रोल, डिझेलची केलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.सायकल चालवून पटेलांनी केला निषेधया रॅलीत खा.प्रफुल्ल पटेल हे स्वत: सायकल चालवित रॅलीत सहभागी झाल्याने या शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीत माजी आ.राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, शिव शर्मा, गप्पु गुप्ता, भय्यू चौबे, विनोद हरिणखेडे, हरगोंविद चौरासीया, निखिल जैन, केतन तुरकर, सोनू बिहारी, लखनसिंह बिहिरीया यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जीएसटीएस व सरकारच्या चुकीच्या करप्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. आम्ही सत्तेत असताना पेट्रोल, डिझेलचे दर प्रती बॅरेल १४० रुपये होते. आता हे दर ८० प्रती बॅरेल असूनही पेट्रोलचे दर प्रती लिटर ८६ रुपयांवर गेले आहे. त्यामुळे सामान्यांवर बोजा वाढत आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी ही प्रतिकात्मक प्रेत यात्रा व सायकल रॅली काढली.- खा.प्रफुल्ल पटेल,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते.