लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : मालकीची व बटईने केलेल्या शेतीतील धान पीक ऐन कापनीच्यावेळी तुडतुडा किडीने फस्त केला. लाखांदूर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी रामदास नैताम ६ एकर शेतीतील मूठभर धान घरी येत नसल्याने ‘जगावे की मरावे’ या विवंचनेत आहे.यंदा खरीप हंगामात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयानी धान्य व्यापारी, खासगी बँका, सेवा सहकारी संस्थाकडून कर्ज घेऊन शेती कसली. यंदा चांगले उत्पन्न येणार म्हणून सारेच आनंदात होते, मात्र धान कापणीच्यावेळी वातावरणात बदल झाल्याने धान पिकावर तुडतुडा किडीने आक्रमण केले अन एकाच रात्री संपूर्ण धानपीक फस्त केले. हातचे पीक जाऊ नये, यासाठी पैशाची तमा न बाळगता एकरी १५ हजाराची औषध एकदा नव्हे तर तीनवेळा फवारणी केली, परंतु काही एक फायदा झाला नाही. संपूर्ण तालुक्यात हीच परिस्थिती आहे. अनेक शेतकरी तर धान पीकाची कापणी सुद्धा करू शकत नाही.सन २०१७-१८ यावर्षी लाखांदूर तालुक्यात ३००० हेक्टर क्षेत्रात आवत्या, २६,९८३ हेक्टर क्षेत्रात रोवणी करण्यात आली. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्र वाढले होते. मात्र शेतकºयांची कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात फसगत झाली.कंपन्यांकडून विकत घेतलेले बियाणे उगवले नाही, जे उगवले ते भरले नाही, जे धान भरले ते कमी दिवसात भरल्याने शेतकºयांनी तालुका कृषी कार्यालयात तक्रारी केल्या. परंतु काही एक फायदा झाला नाही. शेतकºयांचे म्हणने एैकूण घेणारे कुणीही नसल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.लाखांदूर तालुक्यातील अनेक शेतकºयांनी स्वत:ची व बटईने शेती केली. अनेकांकडून उसनवार पैसे घेतले मात्र मूठभर धान्य घरी येत नसल्याने रकमेची परतफेड कशी करायची आणि संसार कसा चालवायचा या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. तालुक्यात ७० टक्क्यांहून अधिक धान पीक तुडतुडा किडीने व्यर्थ गेल्याने यावर्षी उत्पादनात मोठी घट होणार आहे.लाखांदूर तालुक्यात धान पिकावर तुडतुडा किडीने कापणीच्यावेळी आक्रमण केले आहे. हा परिणाम वातावरणात बदलामुळे झाला असून उपाययोजना म्हणून शेतकºयांनी गावातील कृषी वार्ता फलकावरील सूचनांचे पालन केल्यास या किडीवर नियंत्रण आणता येऊ शकते.-निलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी लाखांदूर.
तुडतुडा किडीने केले धानपीक फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:14 PM
मालकीची व बटईने केलेल्या शेतीतील धान पीक ऐन कापनीच्यावेळी तुडतुडा किडीने फस्त केला.
ठळक मुद्देपीक धोक्यात : एकरी १५ हजाराचे कीटकनाशक ठरले कुचकामी