शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

‘त्या’ अधिकाºयांविरूद्ध कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 10:23 PM

कोका येथील राजेंद्र साठवणे या तरूणाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आंदोलकांविरूद्ध हेतुपुरस्पर गुन्हे नोंदविण्यात आले.

ठळक मुद्देनरेंद्र भोंडेकर : प्रकरण कोका येथील तरूणाच्या मृत्यूचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोका येथील राजेंद्र साठवणे या तरूणाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आंदोलकांविरूद्ध हेतुपुरस्पर गुन्हे नोंदविण्यात आले. या आंदोलकांवरील गुन्हे रद्द करून संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी व पोलीस अधिकारी यांच्याविरूद्व कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.कोका येथील रहिवाशी राजेंद्र साठवणे यांचे टेलरींगचे खडकी येथे दुकान आहे. तो नेहमीप्रमाणे खडकीकडे जाताना बोंडे शिवारात रानडुकराच्या कळपाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच करडीचे ठाणेदार कायते, हवालदार नंदेश्वर घटनास्थळी दाखल झाले परंतु वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आले नाही. त्यामुळे जमावाने प्रशासनाप्रती रोष निर्माण झाला. त्यानंतर आमदार चरण वाघमारे, कोकाचे जि.प.सदस्य उत्तम इळपाते, मुंढरीच्या जि.प.सदस्या सारिका चौरागडे, के.बी.चौरागडे, उपसभापती विकास गोन्नाडे, नितेश सेलोकर, सरपंच भुपेंद्र पवनकर, रवि तिडके, अजय नारनवरे, वाल्मिक गोबाडे, बाबुराव ठवकर, भगवान चांदेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन संताप व्यक्त केला. वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडगे यांनी कारधा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत जि.प.सदस्य उत्तम इळपाते, सरपंच नटवीर टेकाम, तंमुस अध्यक्ष तुकाराम हातझाडे, हितेश सेलोकर यांनी अन्य काही लोकांच्या मदतीने कोका वन्यजीव अभयारण्या अंतर्गत येणाºया दुधारा शिवारातील तपासणी नाका जाळुन शासकीय सामानाचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी रात्री दीड वाजता गावात जावून त्यांना ताब्यात घेतले. घटनेच्यावेळी शेंडगे हे तिथे उपस्थित नव्हते. पोलिसांनी मोठे गुन्हेगार असल्यासारखे मध्यरात्री ताब्यात कसे घेतले. असा प्रश्न भोंडेकर यांनी केला. . पत्रपरिषदेला उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, अनिल गायधने, अ‍ॅड.रवि वाढई उपस्थित होते.