ऑनलाईन लोकमतसाकोली : विद्यार्थी, तरुणांनी योग्य वेळी योग्य काम केले पाहिजे. सकारात्मक विचारामुळे यश मिळते. विद्यार्थी तरुणांनी शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करायला शिकले पाहिजे आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून कृती केली पाहिजे, असे प्रतिपादन येथील न्यायालयात कार्यरत दिवाणी न्यायाधीश एन.के. वाळके यांनी केले.मनोहरभाई पटेल महाविद्यालय येथे मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन समारंभ आणि मनोहर व्याख्यानमाला घेण्यात आली. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.आर. त्रिवेदी होते. मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन न्यायाधीश एन.के. वाळके याच्या हस्ते करण्यात आले.मनोहर व्याख्यानमालेत प्रा.डॉ.अरविंद कटरे यांनी अश्रूंची झाली फुले एक अभ्यास या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले. तसेच प्रा.डॉ.शंकर बागडे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रज व्यक्ती व वाङ्मय या विषयावर व्याख्यान केले.याप्रसंगी मराठी विभागातर्फे आयोजित प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, निबंधलेखन, मराठी भावगीत, मराठी हस्ताक्षर, मराठी अभंग गीतगायन, मराठी स्वरचित काव्यवाचन या विविध स्पर्धेतील विजेते नेहा चांदेवार, प्रणय वैद्य, ईश्वरी कापगते, भाग्यश्री लेंडे, निलीमा चुटे, नलिनी मरसकोल्हे, काजल प्रत्येकी, तृप्ती लांजेवार, नूतन मानकर, रोशन केवट, योगेश देशमुख, सरिता सरोते, रोहिणी बोरकर, प्रशांत तुळशीकर, योगेश भेंडारकर, यशवंत गहाणे, पूजा कोडापे, स्वाती कावळे यांना प्रमाणपत्र व पारितोषिक अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेतील सहभागी १५ विद्यार्थ्यांना दिवाणी न्यायाधीश एन.के. वाळके आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.आर. त्रिवेदी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.यावेळी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक भाषण मराठी विभाग प्रमुख डॉ.एस.ए. बागडे यांनी केले. संचालन प्रा.एन.जी. घरत यांनी तर, आभार प्रदर्शन प्रा.डॉ.राजेश दिपटे यांनी केले.यावेळी कार्यक्रमासाठी मराठी वाङ्मय मंडळाच्या अध्या निलीमा वालदे, सचिव सूरज कºहाडे, रामटेके, प्रा.व्ही.टी. हलमारे, प्रा.डी.ए. गहाणे, डॉ.सोनकुसरे, प्रा.चव्हाण, प्रा.डोंगरे, प्रा.रोकडे, डॉ.टेंभुर्णे, प्रा.जांभुळकर, प्रा.बैस, प्रा.कान्हेकर, मोनाली कापगते यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने मराठी विभागातील स्मृतीशेष प्रा.डॉ.अनिल नितनवरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शास्त्रीय दृष्टिकोनातून कृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 12:53 AM
विद्यार्थी, तरुणांनी योग्य वेळी योग्य काम केले पाहिजे. सकारात्मक विचारामुळे यश मिळते. विद्यार्थी तरुणांनी शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करायला शिकले पाहिजे .....
ठळक मुद्देएन. के. वाळके : मराठी वाङ्मयमंडळाचा उद्घाटन सोहळा, मनोहर व्याख्यानमाला