साकोली : शासकीय योजनांचा प्रचार होणे ही काळाची गरज आहे. समाजकल्याण विभागासाठी लोकांना त्यांच्या व्यवसायासाठी तसेच गृहपयोगी साहित्याचे वाटप केले जाते. या योजनांचा लाभ जनतेला मिळाला पाहिजे. तरच शासनाच्या योजनाचा खरा फायदा आहे, असे प्रतिपादन साकोलीचे आमदार राजेश काशिवार यांनी केले.पंचायत समिती येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने साहित्यांच्या वाटप कार्यक्रमाप्रंसगी ते बोलत होते. यावेळी सभापती नारायण वरठे, श्रावण बोरकर, सरपंच आशा शेंडे, यादोराव कापगते, नेपाल रंगारी, खंडविकास अधिकारी व्ही.टी. बोरकर, पंकज टेंभुर्णे, सुनील कापगते उपस्थित होते. यावेळी समाजकल्याण विभागाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या साहित्याचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. यात सायकल २०९, ताळपत्री १०३, सोलर कंदील २८, मच्छीमारांना जाळ १४, अपंगांना अर्थसहाय्य म्हणून चार हजार रुपयाचे धनादेश ४९ लाभार्थ्यांना, अपंगाना विवाह प्रोत्साहन निधी प्रती दहा हजार रुपयाप्रमाणे ३ लाभार्थी, महिलांना शिलाई मशीन वाटप ८७ लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)
शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- काशिवार
By admin | Published: May 30, 2015 12:59 AM