लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : देशामध्ये सर्वत्र भाजप सरकारची कामे बेधडक सुरु आसहेत तरी पण विरोधक टीका करीत आहेत. सरकार लोकांची कामे करीत नाही असा आरोप सर्रासपणे विरोधक करतात. वास्तविक पाहता अनेक शासनाच्या योजना सुरु असून त्याचा लाभ जनतेनी घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केले. ते गोसे (बु.) उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले, या कालव्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून शेतकºयांना आता १२ महिने पिक घेता येईल. लिफ्ट एरिकेशन ही एक शासनाची चांगली योजना असून त्याचा फायदा शेतकºयांनी घ्यावा. भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्य अतिथी आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, डॉ.उल्हास फडके, पवनी भाजपा शहर अध्यक्ष हरिश तलमले, जिल्हा भाजपा सचिव धनराज जिभकाटे, जिल्हा भाजपा डॉक्टर सेलचे अध्यक्ष संदीप खंगार, डावा कालव्याचे कार्याकरी अभियंता झोड, मुख्य अधीक्षक नार्वेकर, माजी जि.प. सदस्य डॉ.हरडे, पाटील, प्रकाश बिलवणे आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते भूमिपूजन फलकाचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक डावा कालव्याचे शाखा अभियंता कमाने यांनी केले. कार्यकारी अभियंता झोड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डाव्या कालव्यावर ११ उपसा सिंचन योजना त्वरीत कार्यान्वित करण्यात येत आहेत. पाईप लाईन टाकून त्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पिके घेता येणार आहेत. याचा लाभ कित्येक शेतकºयांना होईल अशा प्रकारचा नवीन उपक्रम डाव्या कालव्यावर प्रथमच करण्यात येत आहे. या डाव्या कालव्यातून ११ कि.मी. पर्यंतची गावे सिंचनखाली येणार असून यात गोसे, पात्री, वासेळा, कुर्झा, इटगाव, रुयाळ, सिंदपुरी या गावांचा समावेश आहे. जवळ जवळ ७००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून ११ लिफ्ट ऐरिकेशन बसविण्यात येणार असून याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. डॉ.उल्हास फडके म्हणाले की, गोसे धरणाची कामे मागे पडलीत. ३७२ कोटींचा प्रकल्प आज हजारो कोटी मध्ये गेलेला आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था निर्माण करून पिकाचे नियोजन करावे. सर्वांनी समान पिके घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पाण्याचे नियोजन करता येईल. याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, पाणी पुरवठा व्यवस्थापन समितीचे कार्य महत्वाचे आहे. कित्येक पाणी पुरवठा संस्था विजेचे बिल भरत नाही. त्या तोट्यात जातात. त्यामुळे चांगले सदस्य या समितीवर नियुक्त करावेत. जेणेकरून उपसा सिंचन योजना तोट्यात जाणार नाही. कार्यक्रमाचे संचालन शाखा अभियंता यांनी केले. यावेळी ज्ञानेश्वर कावळे, किशोर ब्राम्हणकर, सुरेश आयतुलवार, दिगांबर दावळे, शैलेश मरगडे, शेखर भगत, खेमराज देशमुख, द्रोपद धारगावे, प्रकाश बिलवणे, डॉ.विनायक फुंडे, डॉ.उल्हास हरडे, अनुराधा बुराडे, राजेश चोपकर, दिलीप भेंडारकर, अतुल मुलकलवार, तिलक वैद्य, मच्छींद्र हटवार आदी उपस्थित होते.
उपसा सिंचन योजनेचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 10:55 PM
देशामध्ये सर्वत्र भाजप सरकारची कामे बेधडक सुरु आसहेत तरी पण विरोधक टीका करीत आहेत. सरकार लोकांची कामे करीत नाही असा आरोप सर्रासपणे विरोधक करतात.
ठळक मुद्देतारिक कुरैशी : मुख्य कालव्याचा भूमिपूजन समारंभ