शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

समाधान योजनेचा लाभ घ्या

By admin | Published: October 22, 2016 12:25 AM

महाराजस्व शिबीराच्या माध्यमातून सर्व विभाग जनकल्याणाच्या योजना घेऊन आपल्यादारी आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : पर्यटन क्षेत्र रावणवाडी स्वच्छ ठेवाभंडारा : महाराजस्व शिबीराच्या माध्यमातून सर्व विभाग जनकल्याणाच्या योजना घेऊन आपल्यादारी आले आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त गावकऱ्यांनी घ्यावा. त्यासोबतच रावणवाडी हे जिल्हयातील पर्यटन क्षेत्र असून पर्यटकांची नेहमी वर्दळ असते, त्यामुळे येथील परिसरात कचरा होत असतो. आपले गाव नेहमी स्वच्छ ठेवण्याकरीता नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.रावणवाडी येथे महसूल विभागाच्यावतीने समाधान योजना शिबिरात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसिलदार संजय पवार, सरपंच जगदिश उके उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, रावणवाडी हे गाव सन २०१६-१७ च्या जलयुक्त शिवार योजनेत घेण्यात आले आहे. त्यामुळे शेती व पिण्याकरीता पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ही योजना लोकसभागातून राबवावी. हागणदारी मुक्त योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंत शौचालयाचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शाळेमध्ये लोकवर्गणी करुन डिजीटल शाळा, आंगणवाडी तयार करण्यासाठी समोर येण्याची गरज आहे. या शिबीरात महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, समाज कल्याण, पुरवठा विभाग, भूमी अभिलेख, एकात्मिक बालविकास विभाग, एकात्मिक आदिवासी विभाग, पशुसंवर्धन विभाग, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त महामंडळ, कृषि विभागाने स्टॉल लावले होते. जनकल्याणाच्या योजनाचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.या शिबीरात आधार वाटप, अधिवास प्रमाणपत्र-१८, नॉनक्रिमिलेअर- १०, रेशन कार्ड वाटप-२६, जमिनीचे सामुदायिक पट्टे वाटप-३, शौचालयाचे धनादेश, जात प्रमाणपत्र-१०८, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु झालेल्या कुटूंबांना ४ लाखाचे धनादेश,मिनी टॅक्टर वाटप संमतीपत्र-२, राष्ट्रीय कुटूंब योजना लाभ मंजुरी आदेश-३ ग्रामपंचायत रावणवाडीतर्फे २८ दाखल्याचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य विभागातर्फे १९२ लोकांची रक्तदाब व शुगर तपासणी करण्यात आली.प्रारंभी चिखली येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. प्रास्ताविकात तहसिलदार संजय पवार यांनी समाधान शिबीराची माहिती दिली. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पोहचविण्यासाठीच महाराजस्व   अभियान राबविण्यात येत आहे, या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आभारप्रदर्शन तहसिलदार संजय पवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)