भाजप सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:14 PM2018-12-09T22:14:38+5:302018-12-09T22:15:03+5:30

भाजप सरकारमध्ये सुरू असलला भोंगळ कारभार लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानात उतरण्याची गरज आहे. हेवेदावे न करता पक्षसंघटनेस मजबूत करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.

Take the BJP governor's charge | भाजप सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणा

भाजप सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणा

Next
ठळक मुद्देसत्यजीत तांबे : भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचा निर्धार मेळावा, शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भाजप सरकारमध्ये सुरू असलला भोंगळ कारभार लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानात उतरण्याची गरज आहे. हेवेदावे न करता पक्षसंघटनेस मजबूत करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.भंडारा जिल्हा युवक काँग्रेसतर्फे निर्धार मेळावा बुधवारला साई मंगल कार्यालय भंडारा येथे पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार आनंदराव वंजारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव तथा भंडारा जिल्हा निरीक्षक केतन ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव मुझिफ पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अजित सिंग , तन्वीर विद्रोही, केतन रेवतकर, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, डॉ. अजय तुमसरे , जिल्हा परिषद सदस्य के. के. पंचबुद्धे, भंडारा जिल्हा एनएसयुआय अध्यक्ष वंजारी, नागपूर एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप मसुरकर, भंडारा नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष धनराज साठवणे, भंडारा नगर परिषद सदस्य जयश्री बोरकर, अजय गडकरी उपस्थित होते.
सत्यजित तांबे म्हणाले, सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना भारताचे पंतप्रधान बनवायचे आहे. जिल्ह्यातील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निर्धाराची पूर्ती कशी करता येईल, याकरिता कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने संघटनेत कार्य करावे, सामान्यांपर्यंत कसे पोहोचावे, युवक कांग्रेसला मजबूत करण्याकरिता सर्वतोपरी आश्वासन दिले.बंडूभाऊ सावरबांधे यांनी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसने संघटनेस गावागावापर्यंत पोहोचवून काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावे, पक्षसंघटन मजबूत करून लोकांच्या समस्या सोडविण्याकरिता विशेष लक्ष द्यावे.प्रास्ताविक भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कारेमोरे यांनी केले. संचालन भंडारा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष भूषण टेंभुर्णे यांनी, तर आभार प्रदर्शन भंडारा जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष शैलेश पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता भंडारा विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष भूषण टेंभुर्णे , साकोली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विष्णू रणदिवे, तुमसर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल बिसेन, सचिन फाले, अय्युब पटेल ,सागर भुरे, विवेक गायधने, आशिष भोंगाडे, सचिन कुंभरे, सुनील बनसोड, मंगेश हुमने, जितेंद्र नागदेवे, स्वरूप महाकाळकर, शुभम वैद्य, डॉ. सागर नशिने, शैलेश पडोळे, यशवंत खेडीकर, विशाल भोयार, मोहन निर्वाण, अनिल किरणापुरे, प्रकाश देशमुख, ओम गायकवाड, आशिष ब्राह्मणकर, विक्की राऊत, नरेश करंजेकर, नबिल छव्वारे, उमेश भुरे, आकाश काकडे, मिथुन लिल्हारे, भूपेंद्र साठवणे, महेश बुदे, अमित लांजेवार, महेश हटवार आदींनी सहकार्य केले.

Web Title: Take the BJP governor's charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.