लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाळेमध्ये जाणारी आपली मुले कोणत्या वाहनातून प्रवास करतात. या वाहनाचे चालक प्रशिक्षित आहे अथवा नाही ? शाळा या वाहन चालकांबाबत कोणती काळजी घेते यासंदभार्तील चौकशी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे स्कूलबस व अन्य वाहनांबाबत पालकांनी जागरूक रहावे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी गुरूवारी केले़ पोलीस मुख्यालयात गुरूवारी घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते़मेळाव्याला अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर उपस्थित होते. चौधरी म्हणाले, आपला पाल्य ज्या शाळेमध्ये शिकतो आहे. त्या शाळेतील वाहन व्यवस्थेबाबत पालकांनी जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापनाने यावर अतिशय लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक घरातला मुलगा शहरातील शाळांमध्ये जाताना अतिशय सुरक्षितरित्या शाळेमध्ये पोहोचला पाहिजे़ राजपूत म्हणाले, उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार वाहनांच्या तपासणीची काळजी घेतली जाते तथापि, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, पालक आणि अन्य सर्वच घटकांनी याबाबत काळजी घ्यावी़ न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहनातून वाहतूक करण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या संदर्भात पालक व शाळेसोबत परिवहन समितीचे अधिकारी संवाद कायम ठेवण्याबाबत चर्चा झाली़ शालेय वाहतुकीच्या नियमांचे पालन सर्व घटकांनी करणे आवश्यक असून शाळा व्यवस्थापनाने याकडे मुख्यत्वे लक्ष घालावे़ प्रत्येकाच्या घरातील मुले ही लाख मोलाची असतात. त्यामुळे अतिशय जाणीवपूर्वक या वाहन व्यवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत डोर्लीकर यांनी व्यक्त केले़ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनांची तपासणी करताना काटेकोर नियमांचे पालन करावे, अशी सूचना उपस्थित पालकांनी केली़ शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना वेळोवेळी शिक्षण विभागाकडून सूचना दिल्या जातात़ वाहन व्यवस्था ही मुख्याध्यापकांच्या नेतृत्वात काम करत असते. त्यामुळे शाळेच्या परिवहन समितीने अधिक बारकाईने लक्ष घालावे.नागरिकांची जबाबदारीशहरातील सर्व नागरिकांनीदेखील कोणत्याही शाळेची बस असेल तरी अतिशय सुरक्षितरित्या रस्त्यावर प्रवास करू शकेल व सुलभरीत्या शाळेत पोहोचू शकेल, अशा पद्धतीने वातावरण निर्मिती करावी. नागरिकांनी सहकार्य केल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना आळा बसू शकते, अशी भूमिका पालकांनी मांडली़ मुख्याध्यापकांनी अनेक सुचना केल्या़
मुलांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:05 PM
शाळेमध्ये जाणारी आपली मुले कोणत्या वाहनातून प्रवास करतात. या वाहनाचे चालक प्रशिक्षित आहे अथवा नाही ? शाळा या वाहन चालकांबाबत कोणती काळजी घेते यासंदभार्तील चौकशी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे स्कूलबस व अन्य वाहनांबाबत पालकांनी जागरूक रहावे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी गुरूवारी केले़ पोलीस मुख्यालयात गुरूवारी घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते़
ठळक मुद्देविश्वंभर शिंदे : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने पालक मेळावा