शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

आरोग्याची काळजी घ्या : महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 4:16 AM

गोंदिया : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी व वर्क फ्रॉम होम सुरू झाले आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढत ...

गोंदिया : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी व वर्क फ्रॉम होम सुरू झाले आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढत असून, काही भागात मान्सूनपूर्व वादळी पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज राहावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रामुख्याने कोविड व इतर सर्व रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती व रिफिलिंग उद्योगांसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. सध्या संचारबंदी व कार्यालयीन उपस्थितीच्या निर्बंधांमुळे खासगी व शासकीय कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉर्म होम सुरू आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विजेची मागणीही वाढत आहे. राज्यात वाढत्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यास महावितरण सक्षम आहे. मात्र, मान्सूनपूर्व वादळी पावसाला राज्याच्या काही भागात सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली आहे. वादळी पाऊस किंवा अन्य कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास युद्धपातळीवरील दुरुस्ती कामांद्वारे किंवा पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्याची कार्यवाही करावी. वीज यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

सध्याची कोरोना लाट महावितरणकरिता अतिशय कसोटीची आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सेवा देताना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घ्यावी. कोरोनाबाधित कर्मचारी व कुटुंबीयांना सर्व प्रकारची आवश्यक वैद्यकीय व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी परिमंडल स्तरावरील समन्वय कक्षांमार्फत कामे सुरू आहेत. नियमित व कंत्राटी सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये प्रतिबंधात्मक उपायांकडे कोणतेही दुर्लक्ष करू नये, आरोग्याची गंभीरपणे काळजी घ्यावी, थोडीही लक्षणे दिसली तरी ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी.