सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने, चार वर्षीय अभ्यासक्रम पाच वर्षात पूर्ण होणार असून, विद्यार्थ्यांचा भविष्य टांगणीला येणार असून, सदर अभ्यासक्रमास शिक्षणासाठी महाविद्यालयांना ऑनलाइन शिक्षण देण्यास सांगितले आहे. तसे महाविद्यालय शासनाचा व विद्यापीठाच्या आदेशाचे पालन करीत असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. जर एमबीबीएसचे शिक्षण ऑनलाइन देणे सोयीचे व सुलभ असल्याचे विद्यापीठ व शासनास वाटल असेल, तर मग त्याच अभ्यासक्रमाच्या वार्षिक परीक्षा ऑनलाइन स्वरूपातच घेण्यास काय अडचण आहे. अशा पर्यायाने परीक्षा घेतल्यास अभ्यासक्रम योग्य वेळेत पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना आरोग्यसेवेत सेवा करण्याची संधी योग्य त्या वेळेतच मिळेल व शासनास परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ येणार नाही. ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे स्वागतच असेल, असे विद्यार्थी व पालक यांची प्रतिक्रिया आहे. शासनाने ऑनलाइन परीक्षेचा अवलंब करून सदर परीक्षा वेळेतच पूर्ण करून विद्यार्थ्यांची मानसिक तणावातून मुक्तता करावी, अशी मागणी आहे.
एमबीबीएस विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:38 AM