जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, समितीचे सदस्य मोहन सुरकर, सचिन कुंभलकर उपस्थित होते. जिल्ह्यात असलेल्या अपघात प्रवणस्थळावर चर्चा करण्यात आली, अशा ठिकाणांची माहिती घेऊन त्यावर अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने योग्य ते उपाय करावेत. लाखनी शहरात असलेल्या सर्व्हिस रोडचा उपयोग सर्वसामान्यांना होत नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण काढून रस्ता नागरिकांसाठी मोकळा केला जावा असे निर्देशही खासदारांनी दिले. राष्ट्रीय महामार्गालगत होत असलेल्या वृक्षारोपणाकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले. महामार्गावर होणारे अपघात आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत सोयीचे व्हावे म्हणून रुग्णवाहिका, क्रेन या गोष्टींची व्यवस्था नियमित असावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
भंडारा-पवनी - निलज या राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे प्रवाशांना होणारा त्रास दूर होण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जावेत.
तुमसर व मोहाडी येथे सुरू असलेले रस्त्याचे काम यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. लोकांच्या समस्या जाणून तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, पोलीस, परिवहन आणि उपविभागीय अधिकारी तुमसर यांनी संयुक्त बैठक घ्यावी, असेही खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.