शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

'त्या' भ्रष्टाचाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाई करा

By admin | Published: November 06, 2016 12:39 AM

मृतकाच्या नावाने खोटे देयकाची उचल केलेल्या वरकडे, डब्ल्यु.आर. खान, टी.जी. घुले, गौरी नेवारे व आर.के. देशमुख यांच्या...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भीमसेनेची मागणीभंडारा : मृतकाच्या नावाने खोटे देयकाची उचल केलेल्या वरकडे, डब्ल्यु.आर. खान, टी.जी. घुले, गौरी नेवारे व आर.के. देशमुख यांच्या भ्रष्ट्राचाराची शहानिशा करून फौजदारी कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी भीम सेना संघटनेनी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.मौजा दिघोरी येथील मिश्र रोपवन सन २०१४-१५ ला जंगल गट क्रमांक १४७, १५२, १५५, १५६, १५७ या क्षेत्रात टी.सी.एम. खोदणे व इतर कामाचे ३,९९ हजार ११० रूपयाचे व्हाऊचर तयार करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करून या वन अधिकाऱ्यांनी लाखो रूपयाचा अपहार केला.मौजा कोकणागड येथील संरक्षीत वनक्षेत्रात जंगलांना वनवा लागू नये , यासाठी जाळरेषा तयार करण्याच्या दिवस मंजूर म्हणून २० मार्च २०१५ पर्यंत काम केल्याचे दर्शविण्यात आले. तसेच नारायण दसाराम अंबादे २८ नोव्हेंबर १९९६ ला मृत पावले. त्या मृतकाने सुद्धा २८ जानेवारी २०१५ पर्यंत मजूर म्हणून काम केल्याचे दर्शवून शासनाची फसवणूक करून लाखो रूपयांचा अपहार करण्यात आला. भ्रष्टाचार दडपण्यासाठी मृताच्या कुटूंबियांचे बयान नोंदविण्यात आले आहे. त्या कुटूंबियाविरूद्ध कारवाईची मागणी होत आहे.लाखोचा भ्रष्टाचार उघड येवू नये, यासाठी वनक्षेत्र अधिकारी, मेश्राम यांना मागासवर्गीय असल्या कारणामुळे खोट्या प्रकरणात अडवून निलंबित करण्यात आले. भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ट अधिकारी अभय देत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून शासनाच्या लाखो रूपयाच्या निधीचा अपहार करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करवून शासन सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी आहे.प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास भिमसेना कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. काही अप्रिय घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा राजेश मेश्राम, महेश बागडे, रोशन कोचे, निरज साखरे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, वनमंत्री, वनसचिव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, प्रशासन व दुय्यम संवर्ग नागपूर, उपवनसंरक्षक भंडारा आदींना पाठविले आहे. (नगर प्रतिनिधी)