संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शहरी व ग्रामीण भागातील खेळाडंून प्रोत्साहन देऊन क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी शासनाने येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन क्रीडासंकुल बांधले. मात्र सध्या क्रीडा संकुल तळीरामांचा अड्डा बनला आहे. दारूडे रात्रीच्या वेळी या परिसरात मैफल जमवित असून येथे दारुच्या रिकाम्या बाटल्या अन् ग्लास टाकून देतात. मात्र याकडे स्थानिक यंत्रणाचे दुर्लक्ष होत आहे.येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन मोठे क्रीडासंकुल उभारले आहे. या क्रीडा संकुलात खेळण्यासाठी कुणालाही मानई नाही. मात्र रात्री या क्रीडा संकुलात चौकीदार नसल्याने अंधाराचा फायदा घेत दरूडे आपली मैफल जमवितात. त्यात दारुच्या आहारी गेलेले तरुण बाहेरुन दारुच्या बाटल्या घेऊन या परिसरात बसुन दारु पितात व बाटल्या तेथेच फेकतात. एवढेच नाही तर या बाटल्याही येथे फोडतात. त्यामुळे तेथे कांचांचा खच दिसून येतो. रत्री उशिरापर्यंत या ठिकाणी गोंधळ सुरू असतो. त्याचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागतो. मात्र सध्या याकडे कुणाचेही लक्ष नाही.या क्रीडा संकुल परिसरातच जिल्हा परिषद हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी आहेत. त्यामुळे दररोज याठिकाणी लहान मुलांची ये-जा असते. अनेकदा खेळतांनी लहानमुलांना काचेचे तुकडे रुतल्याच्या घटना येथे घडल्या आहेत. मात्र तरीही प्रशासनाला जाग येत नाही. या क्रीडा संकुलाला लागुनच अनेक घरे आहेत. रात्री जेवन झाल्यावर तर महिला पुरुष फिरायला जातात. तेव्हा दारुड्यांचा त्रास सहन करावा लागतो. या दारुड्यामुळे साकोलीतील क्रीडा संकुल बदनाम तर झालेच आहे. मात्र विद्यार्थी व नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याठिकाणी परिसरात सर्वत्र लाईट लावण्यात यावे, व रात्रपाळीला कायमस्वरुपी चौकीदाराची नेमणूक करण्यात येऊन तळीरामाचा बंदोबस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
साकोली येथील क्रीडा संकुल परिसर बनला तळीरामांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:46 AM
शहरी व ग्रामीण भागातील खेळाडंून प्रोत्साहन देऊन क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी शासनाने येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन क्रीडासंकुल बांधले. मात्र सध्या क्रीडा संकुल तळीरामांचा अड्डा बनला आहे.
ठळक मुद्देयंत्रणेचे दुर्लक्ष : ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या अन् रिकामे ग्लास