शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

तलाठी, मंडळ अधिकारी बेमुदत सामूहिक रजेवर

By admin | Published: November 17, 2016 12:35 AM

शेतकऱ्यांना विनाविलंब अचूक सातबारा, नमूना ८ व इतर कामे विहीत वेळेत व्हावे असे शासनासह सर्वांनाच वाटते.

शेतकऱ्यांची गैरसोय : धान खरेदी होणार प्रभावित, ग्रामीण भागातील कामे ठप्पपालांदूर/लाखनी : शेतकऱ्यांना विनाविलंब अचूक सातबारा, नमूना ८ व इतर कामे विहीत वेळेत व्हावे असे शासनासह सर्वांनाच वाटते. परंतु त्याकरिता प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्टा शासनस्तरावरून न होता केवळ पोकळ आश्वासनांची सरबत्ती सुरु आहे. लाखनी तालुक्यातील तलाठी / मंडळ अधिकारी बेमुदत सामूहिक रजेवर गेले असून त्यांनी तहसीलदार राजीव शक्करवार यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.शेतकरी व शासनाचा दुवा म्हणून तलाठी काम करतो. त्याला येणाऱ्या अडचणींचा पुरेपुर विचार करून सेवा सुरळीत करणे शासनाचे काम आहे. खेडोपाडी इंटरनेट सेवा नाही. चांगल्या दर्जाची संगणक व इतर साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. तलाठ्यांना स्वत:चे कार्यालय नाही. अशा अडचणींची माहिती दोन वर्षापासून शासनाला सांगण्यात आली होती. परंतु सुधारणा न झाल्याने तलाठी, मंडळ अधिकारी बेमुदत रजेवर जाण्याचा ईशारा दिला होता. तहसीलदारांना निवेदन देताना जिल्हा सचिव टी.आर. गिऱ्हेपुंजे, जे.एच. गेडाम व विदर्भ पटवारी संघाचे तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)आल्यापावली परतावे लागले शेतकऱ्यांनाआमगाव/ साकोली : जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेले असल्याने गावागावातील साझामधील कामे पूर्णपणे ठप्प झाले असून शेतकऱ्यांना दाखल्यासाठी व सातबारासाठी आल्यापावली परत जावे लागत आहे.तलाठी साझ्याची व महसूल मंडळाची पुनर्रचना करणे, सातबारा संगणीकरण व ई फेरफार मधील अडचणी दूर करणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामामधून तलाठी संवर्गास वगळणे, कार्यालयासाठी इमारत बांधून देणे, पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना बाबत निर्णय घेणे, अव्वल कारकून संवर्गातील पदे भरणे, वेतनश्रेणीत वाढ करणे इ. मागण्या संदर्भात ३ ते ५ नोव्हेंबरला काळ्या फिती लावून काम केले. ७ नोव्हेंबरला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. १० नोव्हेंबरला अतिरिक्त कार्यभाराच्या चाव्या जमा करण्यात आले. मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे १६ नोव्हेंबर पासून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत. हलक्या धानपिकाची मळणी झाली असून तीविक्री करण्यासाठी शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावर नेत आहेत. मात्र तिथे सातबाराची गरज असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)