आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : निलज खुर्द येथील मंगल भोयर यांच्या अॅथलेटीक्सच्या प्रशिक्षणातून मुलगा राष्ट्रपाल राष्ट्रीय पातळीवर चमकला, नोकरी लागली. त्यांच्या मेहनतीचे यश पंचक्रोशीत पोहचले अन् गरीबांची मुले त्यांचेकडे सरावासाठी आज येवू लागली.त्यांच्या नि:शुल्क प्रशिक्षणातून अनेकांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मैदान गाजविले. काहींना पोलीस व आर्मीची नोकरी मिळाली आहे. ३५ ते ४० मुले त्यांच्याकडे सराव करीत असून सकाळी व सायंकाळी दोन तासांचे प्रशिक्षण दिले जात आहे. निलजचे मैदान होतकरुंसाठी वरदान ठरू पाहत आहे.जेमतेम नववीचे शिक्षण घेतलेल्या मंगल गणाची भोयर यांची २०१० पासून मुलांना अॅथलेटीक्सचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वत:ला समर्पीत केले. त्यांच्या प्रशिक्षणातून क्रीडा प्रबोधनीत निशा भोयर, दिपाली आगाशे, आम्रपाली भोयर, रविता कनपटे, रितीक पंचबुद्धे, कमलेश भोयर, सहयोग कनपटे, अश्विन भोयर आदी प्रतिभावंत प्रशिक्षण घेत आहेत. तर जानेवारी २०१८ मध्ये दोघांची आर्मीसाठी तर दोघांची पोलीस विभागात निवड झाली.आठ ते दहा विद्यार्थी राज्य व राष्ट्रीयस्तरावर चमकले. वर्षभरापूर्वी त्यांनी निलज येथे संकुलन क्रीडा मंडळाची स्थापना करून सध्या या मंडळाचे माध्यमातून रोज ३५ ते ४० विद्यार्थी अॅथलेटीक्सचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणामध्ये ४०० मीटर ट्रॅक, १००, २०० मिटर ट्रॅक, लांब उडी, उंच उडी, ३० मिटर शटल रनिंग व अन्य प्रकारांचा समावेश आहे. क्रीडा प्रशिक्षक अ.वा. बुद्धे यांच्या कार्याने आपण प्रेरीत झाल्याचे ते अभिमानाने सांगत आहेत.एशियन सायकलींग कप स्पर्धेत ब्रांझ पदक विजेती आंतरराष्ट्रीय सायकलपटू सुशिकला आगाशे याच गावातील आहे.राज्यस्तरीय स्पर्धांसाठी सात मुलांची निवडभोयर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या १० ते १४ वर्षे वयोगटातील सात विद्यार्थ्यांची रायगड येथील राज्यस्तरीय अॅथलेटीक्स स्पर्र्धेसाठी निवड झाली. यात यश तिजारे, शुभम शेंडे, कमलेश भोयर, देवेश कुकडे, आयुष मते, सचिन डाकरे, स्नेहल बांते यांचा समावेश होता.रोज सकाळी व सायंकाळी दोन तास नि:शुल्क अॅथलेटीक्सचे प्रशिक्षण देण्यात येते. या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार झाले. प्रशिक्षणासाठी आधुनिक सुसज्ज क्रीडांगणाची गरज आहे.-मंगल भोयर,अॅथलेटीक्स प्रशिक्षक, निलज खुर्द.
‘त्यांच्या’ प्रशिक्षणातून घडताहेत प्रतिभावान खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:16 PM
निलज खुर्द येथील मंगल भोयर यांच्या अॅथलेटीक्सच्या प्रशिक्षणातून मुलगा राष्ट्रपाल राष्ट्रीय पातळीवर चमकला, नोकरी लागली.
ठळक मुद्देमंगल भोयर यांचा पुढाकार : अनेक खेळाडूंना मिळाला रोजगार