भंडारा : जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षक संघाची तालुका सभा २४ सप्टेंबर रोजी केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर यांचे अध्यक्षतेखाली समर्थ प्राथमिक शाळा लाखनी येथे पार पडली. सभेला केंद्रीय सचिव विजय नंदनवार, शाळेचे मुख्याध्यापक मनोजकुमार कावळे, गोविंद प्राथमिक शाळा पालांदूरच्या मुख्याध्यापिका नवखरे, डॉ. आंबेडकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गंथाडे, देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या जिल्हास्तरावर सोडविण्याच्या दृष्टीने तालुकानिहाय कार्यकारिणी गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुढीलप्रमाणे लाखनी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून तालुका अध्यक्ष मनोजकुमार कावळे, सचिव लोकेश गिरी, सहसचिव विनोद गिरी, उपाध्यक्षा गीता नखाते, कोषाध्यक्ष किशोर खंडाईत यांची एकमताने निवड करण्यात आली.
याशिवाय नियमित वेतन एक तारखेला मिळण्यासाठी शिक्षकांचे राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन अदा करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कोषाध्यक्ष रुपेश नागालवडे यांनी केले असून संचलन मरसकोल्हे तर आभार मनोजकुमार कावळे यांनी मानले.
यावेळी दारासिंग चव्हाण, विलास खोब्रागडे, धनविर कानेकर प्रेमलाल मलेवर, जीवनसिंग खसावत, एन. एस. बन्सोड, एस. के. चौधरी, एस. डब्ल्यू. काढगाये, ज. बा. मेश्राम, दुधे, पालांदूरकर, भुरे, बापचे, भदाडे, पुडके, माटे, तिरपुडे, चव्हाण, खोब्रागडे, कुंभालकर, नगरकर, नखाते, रमेश गायधने आदी शिक्षक, शिक्षिका तसेच पदाधिकारी उपस्थित होते.